आषाढी वारी म्हणजे केवळ भक्ती चळवळ नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारे एक विराट आर्थिक चक्र देखील आहे. लाखो वारकऱ्यांच्या पावलांसोबत आळंदी, देहू ते पंढरपूर हा संपूर्ण मार्ग एका फिरत्या बाजारपेठेत रूपांतरित होतो. शेतकरी, मजूर, कारागीर, छोटे व्यापारी, महिला बचतगट, वाहतूकदार, हॉटेल व्यावसायिक ते मोठ्या उद्योगांपर्यंत अनेक घटक या अर्थचक्राशी जोडलेले असतात. वारकऱ्यांच्या गरजा पूर्ण करताना कोट्यवधी रुपयांची उलाढाल घडते आणि ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांना रोजगाराची संधी मिळते. या अर्थकारणाचा वेध घेऊया ..