HinduismNews

अवघा रंग एक झाला.. भाग १६…

“अवघा रंग एक झाला”.. या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…

संत गोरा कुंभार..

एकत्व पाहतां अवघेंचि लटिकें । जें पाहें तितुकें रूप तुझें ।
म्हणे गोरा कुंभार, ऐका नामदेव । तुम्हा आम्हा नांव कैचे कोण ॥ — संत गोरा कुंभार

अर्थात :- सर्व चराचरात एकच परमात्मा वास करतो. त्यामुळे ‘मी-तू’ हा भेद विसरून समभाव, बंधुभाव आणि मानवतेची भावना जोपासावी.

संत गोरोबांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘कर्म हेच ईश्वर’ अशी त्यांची अगाध श्रद्धा होती. चिखल तुडवून मातीची भांडी घडवणे, या आपल्या रोजच्या व्यवसायाला त्यांनी कधीही भक्तीपेक्षा वेगळे मानले नाही. त्यांचा हाच दृष्टिकोन सर्वसमावेशकतेचा पाया ठरतो.

भक्ती करण्यासाठी संन्यास घेण्याची गरज नसून, शुद्ध अंतःकरणाने केलेले कोणतेही प्रामाणिक काम हीच खरी ईश्वरसेवा आहे, असे ते नेहमी म्हणत. गोरोबांच्या अभंगांतून आपल्याला अद्वैत भक्ती, कर्माचे महत्त्व व समतेचा संदेश मिळतो.

निर्गुणाच्या भेटी आलो सगुणासंगे । तव झालो प्रसंगी गुणातीत ॥ अशा त्यांच्या अभंगांत अद्वैताच्या साक्षात्काराची अनुभूती प्रकट झालेली दिसते. प्रपंच करत परमार्थ साधता येतो, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे संत गोरोबाकाका होय.

अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला
Back to top button