News

…10 डाउनिंग स्ट्रीटची हौस फिटली

अवघ्या ४५ दिवसांत लिझ ट्रस यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे उमेदवार ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचा पराभव करणाऱ्या लिझ ट्रस (Liz Truss) यांनी अवघ्या ४५ दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील सदस्यांकडून तीव्र टीका झाल्यानंतर ट्रस यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. गेल्या महिन्यात, सरकारने आर्थिक योजना सादर केली, ज्याच्या अपयशामुळे आर्थिक गोंधळ आणि राजकीय संकट निर्माण झाले होते. यानंतर आता ट्रस यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

अर्थमंत्र्यांचा बळी देऊन खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न?

अत्यंत अपरिपक्व धोरणामुळे अर्थव्यवस्था गडगडल्यानंतर ट्रस यांनी आपल्या अर्थमंत्र्यांचा बळी दिला.वॉशिंग्टनमध्ये अन्य देशांच्या अर्थमंत्र्यांसोबत बैठकीला गेलेल्या क्वारतेंग( finance minister) यांना ट्रस यांनी लंडनला बोलावून घेतले आणि त्यांची हकालपट्टी केली. आपलीच धोरणे राबवणाऱ्या अर्थमंत्र्यांना हाकलणे हे ट्रस यांच्या बाळबोध(बिनडोक) राजकारणाचे लक्षण मानले गेले.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याने अखेरचा अंक लिहिला?

Home secretary ब्रेव्हरमन यांनी बुधवारी अत्यंत तांत्रिक कारणाने राजीनामा दिला. आपल्या खासगी ईमेल पत्त्यावरून अधिकृत कागदपत्रे पाठवल्यामुळे त्यांनी नियमांचा भंग केला आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. आपल्या राजीनामापत्रात चुकीची जबाबदारी स्वीकारण्यावरून ट्रस यांना खडेबोल ही सुनावले. मात्र बुडते जहाज सोडण्यासाठी ब्रेव्हरमन यांनी केवळ कारण शोधले का, अशी शंका राजकीय तज्ज्ञांनी बोलून दाखवली. आणि अपेक्षेप्रमाणे दुसऱ्याच दिवशी जहाज बुडाले.

गेल्या काही दिवसांपासून त्या राजीनामा देतील अशा चर्चा होत्या. त्यांनी राजीनाम्यानंतर त्यांची बाजू मांडली आहे. “मी जी आश्वासनं दिली होती ती सध्याच्या स्थितीमध्ये पूर्ण करू शकले नाही. त्यामुळं पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहे. जेव्हा मी पंतप्रधान बनले त्यावेळी देशात आर्थिक स्थिरता नव्हती. देशातील नागरिकांना वीज बिल कसं भरायचं याची चिंता होती. आम्ही कर कपातीचं स्वप्न पाहिलं होतं. मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया रचण्याचा प्रयत्न केला होता.”मात्र, वर्तमानात ते शक्य नसल्यानं राजीनामा देत आहे, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, यानंतर आता ब्रिटनमधील भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्यासाठी राजकीय समीकरणांनी पुन्हा एकदा नवी आशा निर्माण केली आहे. कदाचित ते लवकरच ब्रिटनचे नवे पंतप्रधान होतील. सध्याच्या परिस्थितीत या पदासाठी ऋषी सुनक हे सर्वांत लोकप्रिय दावेदार आहेत.

ब्रिटन मध्ये फोफावलेल्या आर्थिक गोंधळातून,देशाला सावरायला लिझ ट्रस यांचा कंझर्व्हेटिव्ह पक्ष सक्षम नाही अशी अपयशी टिपण्णी ब्रिटन मधील विरोधी पक्षातील नेते,सर्वसामान्य जनता आणि उद्योजक करत आहेत. याच अपयशी टिपण्णीवर, विरोधकांनी डाव साधून ‘रेडी फॉर ऋषी’ अशी मोहीम हाती घेतली आहे. ब्रिटन मधील डाउनिंग स्ट्रीटवर सध्या ऋषी सुनक यांच्या पुनरागमनावर सट्टेबाजांनी करोडो रुपयांचा डाव दावाला लावल्याचे वृत्त आहे.

लिझ याना स्वतःच्या पक्षातील नेत्यांकडूनच घराचा आहेर मिळताना दिसत आहे. कंझर्व्हेटिव्ह पार्टीमधील काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार, सुनक यांनी ब्रिटनच्या आर्थिक परिस्थितीबद्दल जो इशारा दिला होता तो खरा ठरताना दिसत आहे. याच राजकीय खेळीचा फायदा घेऊन ‘रेडी फॉर ऋषी’ हि मोहिम ब्रिटनभर गाजताना दिसत आहे. पंतप्रधान पदाच्या या शर्यतीवर करोडो डॉलर्सचा सट्टेबाजांचा घोडेबाजार मात्र जोरात फोफावलेला दिसत आहे.

बरं झालं म्हणायचं की आज राणी आपल्यात नाही, नाहीतर राणीला संबंध जगामध्ये ब्रिटनचे इभ्रतीचे वाभाडे निघताना बघून फार वाईट वाटले असते. कोणे एके काळी संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या ब्रिटनला आज IMF कडे भीक मागावी लागतेय. पौर्णिमेनंतर अमावस्या येतेच हेच खरे …

बघा भारताबद्दल काय म्हणाला होता तो विन्स्टन चर्चिल:-

“Power will go to the hands of rascals, rogues, freebooters; all Indian leaders will be of low caliber & men of straw. They will have sweet tongues and silly hearts. They will fight among themselves for power and India will be lost in political squabbles. A day would come when even air and water would be taxed in India.”

ग्रेट ब्रिटनच्या साम्राज्यावरचा सूर्य तर कधीच अस्त झाला होता, आता राजकीय गोंधळ म्हणजे अंधाऱ्या रात्रीची किर्र शांतता आहे.

आता भारतानंच ब्रिटनला आपली वसाहत करावं-ट्रेव्हर नोआह (दक्षिण आफ्रिकेतील कॉमेडियन)

Back to top button