NewsSpecial Day

चैत्यभूमीवर ज्ञानम् च्या स्टॉलवर आकर्षण ठरलेले पुस्तक “जगाला पोखरणारी डावी वाळवी.”

६ डिसेम्बर, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडरांचा (babasaheb ambedkar) महापरिनिर्वाण दिन यादिवशी दादरच्या चैत्यभूमीवर बहुजन बांधव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली देण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी एकत्र येतो. इथल्याच एका स्टॉलवर “जगाला पोखरणारी डावी वाळवी” अभिजित जोग यांचे डाव्यांची तर्कशुद्ध पद्धतीने केलीली चिरफाड पुस्तकाची उपस्थिती…

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी ६ डिसेंबरला अभिवादन करायला येणाऱ्या जनसागराची नीट सोय करता यावी म्हणून शिवाजी पार्कला मोठ्या प्रमाणात महापालिकेतर्फे विविध प्रकारच्या व्यवस्था केल्या जातात. यावेळी इथे मोठं-मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, सामाजिक संस्था एवढचं नाही तर राजकीय पक्षदेखील सहभाग घेतात.आपल्या यथाशक्तीने समाजाचे मार्गदर्शन आणि मदत करण्याचा हेतू या माध्यमातून पूर्ण केला जातो.या व्यवस्थे बरोबरच समाज प्रबोधनासाठी म्हणून स्टॉल उपलब्ध केलेले असतात. यामध्ये विशेषत: पुस्तकांचे आणि इतर वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल देखील लागलेले असतात.

यंदा ही दरवर्षीप्रमाणेच पुस्तक विक्रीच्या स्टॉल्समध्ये “ज्ञानम्” या राष्ट्रीय विचारांच्या पुस्तक विक्रीचा स्टॉल लागला होता.या स्टॉलवर ‘बहुस्पर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘आपले बाबासाहेब’, ‘आम्ही आणि आमचे संविधान’, ‘सत्यमेव जयते’, ‘हमारा मौलिक संविधान’, ‘तथागत का कर्तव्य धर्ममार्ग’ अशी राष्ट्रवादी विचारांची अनेक पुस्तके उपलब्ध होती. सोबतच अनेक समाजसुधारकांचे चरित्रग्रंथ देखील विक्रीसाठी उपलब्ध होते. समाजात समरसता, राष्ट्रवाद दृढ व्हावा आणि वाचनाने समृद्धीकडे जाणारी वृत्ती निर्माण व्हावी यासाठी हा स्टॉल ३ दिवस लागलेला असतो. या स्टॉलवर मूळ किंमतीवर सूट देऊन गुणवत्तापूर्ण पुस्तके उपलब्ध केली होती.

यावर्षी “जगाला पोखरणारी डावी वाळवी” या अभिजित जोग यांनी लिहिलेले पुस्तकाने आपली वेगळीच ओळख अधोरेखित केली. हे पुस्तक उपलब्ध करावे अशी मागणी अनेक बांधवांकडून करण्यात आली होती, ही आश्चर्याची बाब ठरली. या पुस्तकाच्या उपस्थितीने कित्येक वाचकांच्या भुवया उंचावल्या. येणाऱ्या प्रत्येक वाचकाने या पुस्तकला पहिली पसंती दर्शवली. काहींनी चाळले. तर काहींनी प्रश्नांची सरबत्तीच केली. एकूण प्रतिसाद उत्तम ठरला.

महामानव डॉ. बाबासाहेबांचे देखील पुस्तकांवर विलक्षण प्रेम होते. यांतूनच समाजासाठी त्यांनी “शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा” हा संदेश दिला आहे. आपल्या समाज बांधवांना “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हाच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश दिला होता. भारतरत्न डॉ.आंबेडकरांचा मार्ग समाजाच्या न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य यासाठीच आहे. समाजशिल्पी भारतरत्न डॉ.आंबेडकरांच्या विचारांना, विशेषत: शिका या मार्गदर्शक तत्वाकडे बगल देऊन पुस्तकांकडे दुर्लक्ष करण्याने समाजाच्या विचारप्रवाहाच्या मार्गात अडथळा निर्माण होईल.

धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इस्लाम, ख्रिश्चनिटी, कमुनिझम, बौद्ध मत, जैन मत, शीख संप्रदाय आधी साऱ्या विचारधारांचा सखोल अभ्यास करून शेवटी धर्मांतरासाठी या मातीचा सुगंध असणारे बौद्ध मत स्वीकारले.

कम्युनिझमचा पर्याय ठोकरून लावणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी सुसंगत “जगाला पोखरणारी डावी वाळवी” हे पुस्तक महापरिनिर्वाण दिनी आपल्या समाज बांधवांना अल्प दरात उपलब्ध करून देणाऱ्या “ज्ञानम्”च्या ज्ञानसाधनेला आमचे त्रिवार वंदन.. !!!

Back to top button