News

परम पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट…

१९२५ साली स्थापना झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या स्थापनेपासून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, अर्थात शिवराज्याभिषेक दिन हा “हिंदू साम्राज्य दिन”(HINDU SAMRAJYA DIN) उत्सव म्हणून साजरा करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अखिल भारतीय स्तरावर नेण्याचे निर्विवाद श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावे लागेल. एका अर्थी छत्रपती शिवराय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदर्श महापुरुष आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS) परमपूजनीय सरसंघचालक हे संघटनात्मक बांधणीसाठी वर्षातून किमान एकदा देशभरातल्या प्रत्येक प्रांताचा प्रवास करतात. सध्या त्यांचा प्रवास संघाच्या कोकण प्रांतातील मालवण येथे सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा समुद्रातील किल्ला कोकण प्रांतातच आणि तोही मालावणताच आहे. प.पू. सरसंघचालकांचा प्रवास मालवणला असताना त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणे हे ओघाने आले.

नियोजित कार्यक्रमानुसार प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत(MOHANJI BHAGWAT) यांनी काल आपल्या मालवण प्रवासात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाने तयार केलेल्या सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे लोकार्पण केले.

आपल्या सिंधुदुर्ग किल्ला भेटी दरम्यान प.पू. सरसंघसंचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी इतर कोणत्याही किल्ल्यावर नसलेले परंतु फक्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर, शिव राजेश्वर मंदिरात दर्शन घेतले.

याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त तसेच किल्ल्यावरील सरपंच व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत तर केलेच आणि सत्कारही करून त्यांना सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती दिली.किल्ल्यावरील भवानी(BHAVANI MATA) मंदिराचेही त्यांनी दर्शन घेतले आणि टेहाळणी बुरुजावरुन अथांग सागराचेही दर्शन घेत स्थानिकांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील एकमेव असणा-या आणि महाराजांनी प्रत्यक्ष उमटवलेल्या डाव्या पायाच्या व उजव्या हाताच्या ठश्यांचेही दर्शन तसेच किल्ल्यावरील साखरबाव, दहिबाब,दुधबाव या विहिरींचेही दर्शन घेतले.

परम पूजनीय सरसंघचालकांच्या सिंधुदुर्ग किल्ल्याची भेट हा मालवणकरांसाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरला.

https://www.facebook.com/VSKKokan/videos/1148537382496398/

Back to top button