Opinion

देशाची अपरिमित हानी !


देशाचे पाहिले “चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ” आणि माजी लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलीकॉप्टर ला काल तामिळनाडू येथे अपघात झाला आणि त्यात ते स्वतः, त्यांची पत्नी मधूलिका आणि अन्य ११ वीर जवान ज्यात एक ब्रिगेडियर, एक ल. कर्नल अधिकारी आणि अन्य लष्करी अधिकारी आणि जवान यांचा समावेश आहे. या सर्वांची नावे लवकरच समजतील.

या दुःखद घटनेमुळे काल सर्व राष्ट्रप्रेमी भारतीयांना मोठाच धक्का बसला. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करणाऱ्या पोस्ट भरभरून येत होत्या. सध्या समाजमाध्यम हे व्यक्त होण्याचे प्रमुख व्यासपीठ…. बऱ्याच जणांनी त्यांचे स्टेटस म्हणून बिपीन रावत यांचा फोटो ठेवला आहे.

खरच भारताचे न भरून येणारे नुकसान या एका घटनेने झाले आहे. तिनही सेनादलांच्या एकत्रित संचालनाची आवश्यकता समर्थपणे सांभाळणारा एक खंदा वीर आज आपल्यातून निघून गेलाय. भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाची पायाभरणी आत्ताच्या काळात करणारा हा द्रष्टा नेता…. परकीय शास्त्रांवरील अवलंबित्व कमी करून स्वदेशी शस्त्रास्त्रे यांच्या वापरावर भर देणारा असा हा नेता…. चीन सोबतच्या सध्याच्या सुरू असलेल्या संघर्षात महत्वाची भूमिका बजावणारा नेता…. त्यांच्या एकूणच करकीर्दीवर भरभरून लिहिता आणि सांगता येईल….. त्यांना मिळालेली पदकेच त्यांचे कर्तृत्व सांगण्यास पुरेशी आहेत….. ती खालील प्रमाणे
१. MONUSCO
२. 9 Years Long Service Medal
३. 20 Years Long Service Medal
४. 30 Years Long Service Medal
५. 50th Aniv of Independance
६. Videsh Seva Medal
७. High Altitude Service Medal
८. Sainya Seva Medal
९. Operation Parakram Medal
१०. Special Service Medal
११. Samanya Seva Medal
१२. Wound Medal
१३. Vishisht Seva Medal
१४. Sena Medal
१५. Yudh Seva Medal
१६. Ati Vishisht Seva Medal
१७. Uttam Yudh Seva Medal
१८. Param Vishisht Seva Medal

जन रावत यांच्या खंबीर भूमिकेला चीन, पाकिस्तान आणि अन्य अस्तनितले निखारे यांचा विरोध होता…. त्यामुळे हा घातपात तर नाही ना अशा शंकाही व्यक्त केल्या जात आहेत…. अर्थात चौकशीतून सत्य बाहेर येईलच…. तो पर्यंत आपण काही निष्कर्ष काढणे योग्य नाही….

सध्या भारत एका विशिष्ट अशा आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. चीन, पाकिस्तान, इसिस आणि दहशतवादी पिल्लावळ आणि त्यांचे भारतभर पसरलेले पाठराखण करणारे डावे, मधले आणि आजूबाजूचे, लिब्राडू, विकाऊ माध्यमे…. या सर्वांचा होणारा परिणाम आणि त्याला समर्थ पणे तोंड देण्यासाठी करावी लागणारी योजना आणि कार्यवाही…. सध्याचे सरकार या सर्वांना समर्थपणे तोंड देण्याचा प्रयत्न करत आहे…. आणि या प्रयत्नांचा समर्थ आधार असणाऱ्यांपैकी एक म्हणजे जन बिपीन रावत…. आणि त्यांचे द्रष्टे नेतृत्व. त्यांची सध्याच्या काळातील दोन वक्तव्य त्यांचे द्रष्टेपण आणि खंबीर नेतृत्व यांची साक्ष देतात….
“पहिली गोळी आम्ही चालवणार नाही, पण नंतर आम्ही आमच्या गोळ्यांचा हिशोबही ठेवणार नाही….”
“सध्या देशाला २ १/२ शत्रूंशी लढायचे आहे…..”
हे अत्यंत सूचक आणि देशवासियांना सावध करणारे वक्तव्य…. यातील दोन घटकांशी लढण्यास लष्कर समर्थ आहे….. पण हा अर्धा घटक कोणता?…. वर वर्णन केलेले घरभेदी…. यांच्याशी आपणच…. सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी लढायचे आहे!!…. आणि ही लढाई सर्वात कठीण. सीमेवर शत्रू समोरासमोर लढतो…. पण हा घरभेदी शत्रू दिसत नाही आणि पाठीत खंजीर खुपसतो. बऱ्याच वेळा आपल्या डोळ्यावर भोळसटपणाचे आवरण चढलेले असते, सेक्युलरवादाचे भूत डोक्यावर बसलेले असते आणि हा घरभेदी शत्रू ओळखता येत नाही…. जन बिपीन रावत यांनी याकडे आपल्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.

यासाठी आणखीन एक बाब लक्षात घेण्याजोगी…. एरवी अतिरेकी मारले गेल्यावर गळा काढणारे तथाकथित मानवतावादी…. जसे अरफा खानुम, स्वरा भास्कर, राजदीप, कन्हैया, खालिद आदी मंडळी यांचे तोंड बंद आहे. काल ट्विटर वगैरे समाज माध्यमांवर या बातमी वर हसण्याचे इमोजी टाकणारे कोण आहेत हे जरा तपासून पहा….. म्हणजे मग हे १/२ आघाडी वाले लोक कोण हे सहज समजून येईल…. जन रावत यांच्या वरील वक्तव्याविरोधात मत मांडणारी मंडळी कोण होती हे सुद्धा समजून घ्या म्हणजे चित्र स्पष्ट होईल!!!….

जन बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य ११ लष्करी अधिकारी आणि जवान यांना वीरमरण आले. या सर्वांचे अचानक जाणे हे भारताचे आणि वैयक्तिक माझे/तुमचे/आमचे प्रचंड नुकसान आहे…. जणू काही आपल्या घरचीच ज्येष्ठ आणि कर्तृत्ववान व्यक्ती आपल्याला पोरके करून गेली आहे…. आणि या भावानेची प्रचिती सर्वांच्या समाजमाध्यमातून आणि वैयक्तिक बोलण्यातून व्यक्त होण्यातून दिसत आहेच….

मंडळी, सी डी एस जन बिपीन रावत आणि सर्व शूर वीर जवान यांना खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांचे वरील दोन वक्तव्यांतील गर्भितार्थ लक्षात घेऊन आपण सामान्य नागरिकांनी या पुढे सतर्कता आणि जागृतता दाखवणे, कठोरपणे तथाकथित सेक्युलरवादाचे भूत फेकून देऊन राष्ट्र हितार्थ आपला दैनंदिन व्यवहार करणे हे होय…. राष्ट्रविरोधी पिल्लावळ ओळखून वेळीच त्यांचा बंदोबस्त आणि त्यांना नेस्तनाबूत करण्याचे काम हे आपल्यालाच करावे लागेल….

मंडळी, माझा आणि तुमचा एक दोष सांगू??…. सार्वत्रिक आहे, काही सन्माननीय अपवाद वगळता….. एखादी घटना घडल्यावर आणि ती वाचताना सोबत घेत असलेल्या गरम चहासोबत आपलेही रक्त गरम होते…. राष्ट्रप्रेमाची आणि कर्तव्यभावनेची एक जोरदार लहर संचारते…. आणि जसा चहाचा कप चहा संपल्यावर थंड होतो तसे आपले गरम झालेले रक्त ही थंड होते…. आणि राष्ट्रप्रेम, कर्तव्यभावना ही बॅकफूट ला जाते…. आणि पुन्हा आपण सेक्युलरवादाचे भूत डोक्यावर बसवून शांत होतो…… आणि मग…..

मंडळी, खरच या भारतमातेच्या सुपूत्रांचे बलिदानाचे दुःख आपल्याला झाले आहे का?…. मग त्यांना केवळ शाब्दिक श्रद्धांजली नकोय….. आपल्या यापुढील सतर्क वागण्यातून आणि कृतीतून ती दिसायला हवी….. या १/२ पठडीतील लोकांशी तुम्हा आम्हालाच लढायचे आहे….. आहोत का तयार आपण?

भारतीय वीरांचे मरण स्वस्त नाही हे आपण दाखवून देऊयात…. व्यर्थ न हो बलिदान

आपण तमाम राष्ट्रप्रेमी आणि जागृत भारतीयांच्या वतीने वीरमरण आलेल्या जन रावत, त्यांच्या पत्नी आणि सर्व वीर जवान यांना भावपूर्ण श्रद्धांजली

अरविंद जोशी

Back to top button