Opinion

धर्मांधतेची देशविघातक केंद्रे

“धर्म” या एका शब्दावरून धर्मावर असलेली आपली पकड किती मजबूत आहे हे दाखवण्यासाठी व ती वेळोवेळी सिद्ध करण्यासाठी अंमलात आणण्यात आलेल्या असंवैधानिक, हिंसक मार्गाचा वापर करून, कायदा हातात घेऊन व त्याची मोडतोड करत तसेच सार्वजनिक मालमत्ता, पोलिस यंत्रणा यांना वेठीस धरून धर्मांधतेचा विखारी धुमाकूळ घालणारा त्रिपुरातील मुस्लिम समुदाय तसेच रझा अकादमी पुरस्कृत महाराष्ट्रातील मुस्लिम समुदाय आणि धर्माच्या उपदेशाखाली स्व-धर्मातील लोकांना इतर धर्माविरुद्ध चिथावणी देणार्‍या आयआरएफ(इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन) सारख्या मुस्लिम धार्मिक संघटना या देशाच्या सार्वभौमत्वाला तसेच देशातील इतर धर्मासाठी, त्या धर्मातील लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी किती घातक आहेत हे काही दिवसांपूर्वी त्रिपुरातील तिथे न घडलेल्या घटनेचं निमित्त करून हिंदूंविरुद्ध धर्मांध आक्रोश करत त्रिपुरातील हिंदू देवतेची विटंबना व हिंसाचाराच्या घटनेतून दिसून आलं .

त्रिपुरातील याच खोट्या व न घडलेल्या घटनेचं निमित्त करून महाराष्ट्रात नांदेड, मालेगाव आणि अमरावती या तीन शहरात रझा अकादमी या धर्मांध मुस्लिम पुरस्कृत संघटनेने अमानुष दंगली घडवून या तीन शहरातील कायदा-सुव्यवस्था, सार्वजनिक मालमत्ता, यांचं अतोनात नुकसान करत तेथील पोलिस यंत्रणा पायदळी तुडवली. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी त्रिपुरातील पाणीसागर येथे विश्व हिंदू परीषदेकडून बांग्लादेशातील हिंदूंवर झालेल्या “हालिया” हिंसेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. नेमकं याच मोर्च्यादरम्यान तसेच मोर्चा हा हिंदू संघटनेचा असल्यामुळे या शांततेने सुरू असलेल्या मोर्च्याला गालबोट लावण्यासाठी सोशल मिडियावर हिंदूंच्या या मोर्च्याविरोधात पाणीसागर येथील मशीद व दुकाने जाळल्याचे खोटे फोटो व खोटी माहिती पसरवली गेली.

सोशल मीडियावरून पसरवण्यात आलेल्या फोटो व माहितीतील तथ्य मुस्लिम समुदायाने न तपासता उनाकोटी येथे मुस्लिम समुदायाने शुक्रवारी हिंदूंच्या कैलाशहार स्थित काली मंदिरावर हल्ला करून देवीच्या मुर्तीची विटंबना करून ती तोडली. एवढंच नाही तर यानंतर अभाविप(अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) कार्यकर्त्यावर काँग्रेसच्या युवा संघटनेच्या (एनएसयूआय) व तृणमूल काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. उनाकोटी येथे शुक्रवार ची नमाज झाल्यानंतर प्रत्येक मशिदीतून पाणीसागर येथे सोशल मिडियातील खोट्या फोटो व मजकुरावरून हिंसाचार आणखी भडकवण्यात आला. त्रिपुरातील न घडलेल्या घटनेवरून सुरू असलेल्या अमानुष हिंसाचारावरून महाराष्ट्रात रझा अकादमीने ही नांदेड, मालेगाव आणि अमरावती या तीन शहरात मोर्चे व सामूहिक बंद करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय रझा अकादमी मार्फत पूर्वनियोजित होता. वास्तविक या मोर्चासाठी व बंद साठी कुठलीही परवानगी देण्यात आली नव्हती तरीही हे मोर्चे व त्यानिमित्ताने या तीन शहरात प्रचंड तणाव परिस्थिति निर्माण करण्यात आली.

व्यापारी, सार्वजनिक आस्थापने, सार्वजनिक मालमत्ता, यांचे प्रचंड नुकसान तसेच सामान्य नागरिकाला ही रझा अकादमी पुरस्कृत आंदोलनाची विनाकारण झळ सोसावी लागली. विशेषत: अमरावतीत तणाव वाढल्यामुळे दोन-तीन दिवस संचारबंदी लावण्यात आली. अनेक निरपराध हिंदूंवर खोटे गुन्हे नोंदवण्याचे प्रकार अमरावतीत सुरू झाले. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व नेत्यांवरही खोटे गुन्हे नोंदवले गेले. या दरम्यान केंद्र सरकारने कथित धर्मगुरू झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन( आयआरएफ) या दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या संघटनेवर पाच वर्षासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला. झाकीर नाईक वर त्याच्या संघटनेमार्फत तो मलेशियातून दहशतवादी कारवाया चालवत असल्याचा आरोप केंद्र सरकारने त्याच्यावर केला आहे. काही वर्षांपूर्वी झाकीर नाईक च्या आयआरएफ संघटनेवर वर (यूएपीए) या बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली होती.

रझा अकादमी आणि आयआरएफ या मुस्लिम संघटना धर्माच्या आधारावर त्यांचे सदस्य आणि अनुयायांना चिथावणी देऊन धार्मिक द्वेष पसरवून शत्रुत्व भावना निर्माण करत आहेत हे मागील आठवड्यातील हिंसक घटनांवरून दिसून येतं. झाकीर नाईक हा इंटरनेट सॅटेलाइटच्या माध्यमातून जगभरातील अनुयायांशी संवाद साधून त्यांच्यामध्ये धार्मिक द्वेष पसरवतो तर रझा अकादमी त्रिपुरातील मुस्लिम समुदायाला पाठिंबा दर्शवत पूर्वनियोजित हिंसाचार केला. भारतातील मुस्लिम समुदायाने धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या रझा अकादमी किंवा आयआरएफ सारख्या विखारी, दहशतवादी संघटनांशी कुठलेही संबंध ठेऊ नयेत तसेच त्यांचे सदस्य व अनुयायी होऊ नये. रझा अकादमी आणि नाईक ची आयआरएफ या धार्मिक द्वेष व हिंसाचार घडवणार्‍या संघटनांचा धर्मांध इतिहास अनेक वर्षांपासून देशात व महाराष्ट्रात सुरू आहे. १५ वर्षांपासून रझा अकादमी महाराष्ट्र पेटवत आहे. भिवंडी, मुंबई येथे ५ जुलै २००६ रोजी रझा अकादमीने अमानुष हिंसाचार केला.

भिवंडी येथे पोलिस ठाण्याची इमारत बांधली जात होती ती जागा सरकारची किंवा पोलिस खात्याची नसून कब्रस्तानची आहे असा दावा रझा अकादमीने त्यावेळी केला. याच गोष्टीचं निमित्त करून रझा अकादमीने पोलिस इमारत बांधणीचं काम बंद पाडले आणि जातीय तेढ निर्माण करून तेथे आंदोलन करून जबरदस्त हिंसाचार केला. पोलिसांना या तणावग्रस्त परिस्थितीत संचारबंदी लावावी लागली होती. रझा अकादमीच्या या हिंसाचारात गांगुर्डे आणि जगताप हे दोन पोलिस शिपाई जमावाकडून मारले गेले. भिवंडीतील ज्या जागेवर रझा अकादमीने दावा केला होता ती जागा मुंबई मुस्लिम वक्फ बोर्डाने सरकारची आहे असे आधीच सांगितले होते व तिथे पोलिस ठाण्याची इमारत झाली पाहिजे हे ही सांगितले होते असे असतांना रझा अकादमीने त्या जागेवर खोटा दावा सांगून व कब्रस्तानचं खोटं कारण देऊन तिथे हिंसाचार माजवला. रझा अकादमीने निर्माण केलेल्या या हिंसक व तणावग्रस्त परिस्थितीचा परिणाम म्हणून काही दिवसात ११ जुलै रोजी मुंबई उपनगरीय लोकल ट्रेन मध्ये बॉम्बस्फोट घडवला गेला तब्बल २०९ निरपराध लोकं या स्फोटात मृत्यूमुखी पडले. या स्फोटाचे आरोपी पकडले गेले पण ही स्फोटाची घटना रझा अकादमीने सुरू केलेल्या हिंसक आंदोलना नंतर काही दिवसातचं घडली होती अर्थात या स्फोटाच्या घटनेला रझा अकादमीच्या आंदोलनाची पार्श्वभूमी होती हे निश्चित. नाईक च्या आयआरएफ वर जशी पाच वर्षांची बंदी घातली गेली तशीच बंदी रझा अकादमीवर ही घातली गेली पाहिजे. दहशतवाद पुरस्कृत संघटना या देशातून हद्दपार होणं देशाच्या हितासाठी, सुरक्षेसाठी व देशातील नागरिकांसाठी अत्यावश्यक आहेत. केंद्र सरकार दहशतवादाचं उच्चाटन करण्यास सक्षम आहे तसेच जागरूक व सतर्क ही आहे. त्यामुळे आयआरएफ आणि रझा अकादमी या धार्मिक द्वेष, हिंसाचार पसरवणार्‍या देशविघातक संघटनांवर केंद्र सरकारकडून कायमस्वरूपी बंदी येऊन त्या महाराष्ट्रातून व देशातून निश्चितपणे घालवल्या जातील अशी अपेक्षा करू.

लेखक – किरण गोटीमुकुल, नांदेड
मो. 8975945566

Back to top button