News

भारत व हिंदू विरोधी मानसिकता पसरविणाऱ्या बीबीसी विरोधात हिंदूंनी दंड थोपटले

पोर्टलॅंड, लंडन येथील बीबीसी हाऊस समोर डझनभर हिंदू संघटनांनी बीबीसीच्या भारत व हिंदू विरोधी मानसिकता पसरविणाऱ्या धोरणाबाबत २९ ऑक्टोबर २०२२ रोजी निदर्शने केली. अनेक हिंदू संघटनांनी एकजूट दाखवत सप्टेंबर पासूनच ट्विटरवर अभियान सुरू केले होते. यात द गार्डियन वृत्तसमूह व बीबीसी वृत्तवाहिनी यांच्या विरोधात , भारत व हिंदूंची जाणीवपूर्वक प्रतिमा मलिन करण्याच्या धोरणाबाबत हिंदूंमध्ये जागरूकता आणण्याचे काम, या संघटनांनी केले आहे. त्यामुळे लिसेस्टर दंगलीनंतर हिंदूंमध्ये जागृती होऊ लागली आहे . सरकार देखील मुख्य प्रवाहातील वृत्तसमूहांच्या बातम्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवत असेल तर फेक न्यूज वरुन बातम्या करणा-या , भारत आणि हिंदू फोबिया असणाऱ्या द गार्डियन आणि बीबीसी सारख्या प्रसार माध्यमांच्या मुळावरच घाव घालवा , अशी भावना आता दंगलीचे चटके अनुभवणाऱ्या हिंदूंमध्ये बळवली आहे. आणि त्याचेच द्योतक म्हणून हिंदूंमध्ये जागरुकता येऊन त्यांनी एकजुटीने या हिंदू व भारत विरोधी मानसिकतेला , सर्व माध्यमातून जोरकस विरोध प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे. यात ब्रिटनमधील अनेक प्रतिष्ठित हिंदू कुटुंब व व्यक्तिमत्व सामील झालेले आहेत . त्यांनी सर्वप्रथम २८ सप्टेंबर २०२२ रोजी द गार्डियन (the guardian ) या वृत्तपत्र समूहा विरोधात निदर्शने केली व त्यानंतर आपला लढा पुढे चालू ठेवला.
बीबीसी विरोधात निदर्शने करण्याआधी हिंदू संघटनांनी एक निवेदन जारी केले , त्यात त्यांनी म्हटले आहे की जोपर्यंत बीबीसी जागतिक पातळीवर हिंदूंची अवहेलना बंद करणार नाही, तोपर्यंत बीसीसी विरोधात निदर्शनं करण्याचा आमचा दृढ संकल्प आहे. हिंदूंविषयी वर्णन करताना बीबीसी अतिरंजीत शब्दांचा वापर करते. तसेच भारताची बातमी देताना केवळ नकारात्मक शब्दांचा प्रयोग केला जातो. जगातील सर्वात मोठी लोकशाही व अर्थव्यवस्था असणाऱ्या भारताविरुद्ध पक्षपाती बातमीदारी भारत व युकेच्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या विरोधी आहे.

द गार्डियन आणि बीबीसी विरोधात ट्विटरवर अभियान सुरू होण्याचे मूळ कारण, २८ ऑगस्ट २०२२ रोजी भारत पाकिस्तान टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानचा केलेला पराभव. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे भारतीयांनी (म्हणजेच हिंदूंनी )केलेला जल्लोष आणि त्यामुळे मुस्लिमांना झालेली पोटदुखी. मागील अनेक वर्ष भारत-पाक क्रिकेट सामन्यानंतर भारत विजयी झाल्यावर, भारतीय घराबाहेर पडून जल्लोष साजरा करतात . असे ब्रिटनच्या अनेक प्रमुख शहरात दिसून येते. परंतु यावेळी मात्र या जल्लोषात काही मुस्लिम लोकांनी विरोध केला. कदाचित हा सुनियोजित षड्यंत्राचा एक भाग असू शकतो. थोडी बाचाबाची , हमरातुमरी होऊन प्रकरण थांबले होते. परंतु केवळ फेक न्यूजच्या जोरावर ही दंगल भडकविण्यात काही लोक यशस्वी ठरले. यात चिंतेची बाब अशी की , केवळ सोशल मिडियावरील फेक न्यूजच्या अपप्रचाराला बळी पडले आणि ब्रिटन सारख्या प्रगत देशातील मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रांनीही त्याचीच री ओढली, हे दुर्दैव की हिंदू विरोधात पद्धतशीरपणे चालवलेले षडयंत्र, अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाला .आणि सर्वात महत्त्वाचे लिसेस्टरच का?

युनायटेड किंगडम मध्ये हिंदूंची संख्या तेथील एकूण लोकसंख्येच्या केवळ १.६% एवढी आहे, साधारण दहा लाख एवढी. पण युकेच्या जीडीपीमध्ये मात्र ६.५% योगदान आहे. हिंदूंचे सर्वच सण हिंदूंसोबत येथील स्थानिकही थाटाने साजरे करतात. हिंदूंनी येथे आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे तसेच अफाट मेहनतीमुळे आज प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. हेच तर त्यांच्या डोळ्यात खूपच नसेल ना? लिसेस्टरच दंगलीसाठी निवडण्याचे कारण , हिंदूंचे प्रमाण युरोपच्या पटीत एका या छोट्या शहरात फार मोठे आहे. सुनियोजीत दंगलीत हिंदूंच्या दाट वस्तीमुळे जास्तीत जास्त नुकसान करता येऊ शकते .त्यामुळे देशभरातील हिंदू भयभीत व्हावेत हा विचार असावा.
लिसेस्टर शहरातील झालेल्या बाचाबाचीचा २८ अॉगस्ट रोजीच विषय संपला होता परंतु दबा धरून बसलेल्या (वा हा वादही सुनियोजित षडयंत्राचा भाग असू शकतो) सोशल मीडियाच्या शूटर्सनी संधी साधत, आपल्या एकांगी बातम्या अर्थात फेक न्युज शूट केल्या . ट्विटरवर यावरून धुमाकूळ घातला आणि द गार्डियन आणि बीबीसी सारख्या मुख्य प्रवाहातील वृत्तसमूहांनी याची शहानिशा न करता वा जाणीवपूर्वक त्याचा प्रसार केला. त्याचा परिणाम म्हणून शे-दोनशे मुस्लिमांच्या गटाने टार्गेट करून हिंदूंची घरे फोडली , कार मधील मुर्त्या पाहून कार फोडल्या , दगडफेक केली, दोन हिंदूंना भोसकण्यात आले व हिंदूंच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान करण्यात आले. आणि हे सगळे बिनधास्तपणे सुरू होते युके सारख्या प्रगत देशात .
हिंदूंच्या मनात दहशत बसावी हा या कृती मागील षडयंत्राचा भाग असल्याचे जागरूक हिंदूंनी आता ओळखले आहे . म्हणूनच हिंदूंच्या संघटनांनी एकत्र येऊन त्याच्या मुळावरच घाव घालावा, म्हणून सप्टेंबर पासून या वृत्तसमूहांच्या विरोधात जोरदार निदर्शने सुरू केली आहेत.

हिंदू व भारतीय म्हणून आपणही समाज माध्यमांचा योग्य वापर करून, या अभियानाला प्रतिसाद देऊन जगभरातील वृत्तसमूहांना संदेश देण्यात व बीबीसी सारख्या वृत्त समूहाला धडा शिकवण्यासाठी , या अभियानाला पाठिंबा दिला पाहिजे. नव्हे ते आपले कर्तव्यच आहे.

Back to top button