HinduismPolitics

मलंगगड येथे हिंदूंवर कट्टरपंथियांची अरेरावी, ‘अल्ला हू अकबरचे नारे’

कल्याण, दि. ३१ मार्च – मलंगगड येथे होळीच्या दिवशी मच्छिंद्रनाथांच्या समाधीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बजरंग दल तसेच  विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना मुस्लिम कट्टरपंथियांनी अरेरावी, घोषणाबाजी करत आरती करण्यास मज्जाव केला. या प्रकरणी हिललाईन पोलीस स्थानकात कट्टरपंथियांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंदूंच्याच श्रद्धास्थानाच्या ठिकाणी त्यांच्यावरच अरेरावी केल्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले असून या प्रकाराबाबत संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.    

प्राप्त माहितीनुसार, २८ मार्च रोजी मलंगगडावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मच्छिंद्रनाथांची आरती करत असताना काही कट्टरपंथी मुस्लिम तेथे आले व त्यांनी ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दिल्या व आरती करण्यास मज्जाव केला. हिंदू बांधवांना धक्काबुक्कीही करण्यात आली. या प्रकरणी मुन्ना शेख, झाकीर शेख, मोहम्मद शेख, गु्ड्ड शेख, तौक्कीर शेख, हुसेन अन्सारी, सरफराज शेख यांच्यासह २० जणांच्या विरोधात जमावबंदीचा भंग तसेच कोरोना नियमावलीचे पालन न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंग दल व विहिंपच्या कार्यकर्त्यांवरही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी ट्वीट करत या प्रकरणी प्रतिक्रिया नोंदवली आहे. मलंगगडावर होणारी मच्छिन्द्र नाथांची आरती बंद पाडण्याची कट्टरतावाद्यांची हिम्मत होते कारण राज्यात कणा नसलेले ठाकरे सरकार सत्तेवर आहे. इटालियन मातोश्रींना मुजरा करणाऱ्या ‘जनाबसेने’चे हिंदुत्व ‘टक्केवारी’च्या लाटेत वाहून गेले आहे, असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दरवर्षी होळी पौर्णिमेला भाविक मच्छिंद्रनाथांच्या समीधीचे दर्शन घेण्यात जातात. यंदा मलंगगड यात्रा कोरोनामुळे रद्द झाली असली तरी काही निवडक भाविक पूजा, आरतीसाठी गडावर आले होते. यावेळी ही घटना घडली. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी जात असलेल्या मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनाही अटक करण्यात आली आहे.

मलंग गडावरील यात्रा हा उपक्रम शिवसेनेने ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात पाय घट्ट रोवण्यासाठी अनेक वर्षे राबविला. शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली ही यात्रा अनेक वर्षे जिल्ह्य़ातील शिवसेनेचा मुख्य वार्षिक कार्यक्रम असे. मात्र, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना हिंदूंवर ही वेळ ओढावल्याने सर्वत्र आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.

**

Back to top button