ChristianityNews

यज्ञमंडपात हौदोस घालणारे आधुनिक राक्षस गण… डीएमके

द्रविड मुन्नेत्र कळघमच्या गुंडांनी मंदिराचा अभिषेक सोहळा रोखण्याचा प्रयत्न केला आणि यज्ञशाळा उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली.

इरोड कॉर्पोरेशन ऑफिसच्या आवारात असलेल्या राजा गणपती मंदिराचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले होते आणि 4 डिसेंबर रोजी अभिषेक सोहळा आयोजित करण्याचे नियोजित होते. हे मंदिर इरोड कॉर्पोरेशन ऑफिसच्या आधीपासून आहे,आतापर्यंत मंदिराचा कारभार कोणताही अडथळा न होता चालत होता. परंतु जागेच्या अडचणीमुळे ऑफिस समोर यज्ञशाळा उभारण्यात आली होती. डीएमकेच्या गुंडानी मात्र इरोड कॉर्पोरेशन मैदानात होणाऱ्या अभिषेक सोहळ्याला विरोध केला. त्यांनी कुदळ,फावडे घेऊन यज्ञशाळा उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. डीएमकेची उपशाखा असलेल्या द्रविडर विदुथलाई कळघम (DVK) या कट्टर द्रविडियन संघटनेच्या गुंडानी “धर्मनिरपेक्ष सरकारी जागेत” यज्ञ, पूजा, अभिषेक होऊ देणार नाही अशी धमकी दिली आणि यज्ञमंडपाची नासधूस करण्यास सुरवात केली. त्यांनी सोबत आणलेले कुदळ आणि फावडे वापरून बळजबरीने यज्ञशाळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे.

गेली अनेक दशके कॉर्पोरेशन ऑफिस मंदिर परिसरात आहे तेव्हा का नाही दिसली धर्मनिरपेक्षता ?

मंदिर अनेक वर्षांपूर्वी बांधले गेले.काही वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार झाला तेव्हा ते कुठे गेले होते हे उपद्रवी ?

जेव्हा हेच सरकार मंदिरांचा निधी आणि महसूल वापरते तेव्हा यांना धर्मनिरपेक्षता आणि येत नाही का? आणि जर राज्य सरकार मंदिरांचा निधी वापरणार असेल तर सरकारी कार्यालयांमध्ये मंदिरे असण्यात गैर काय?

कल्लाकुरीचे जिल्हाधिकारी कार्यालय मंदिराच्या जमिनीवर बांधण्यात आले आहे. जेव्हा सरकार मंदिरांची जमीन, पैसा आणि इतर संपत्तीचा सढळ हस्ते वापर करते त्याच मंदिरांचा, त्यांच्या पूजा पद्धतीचा, यज्ञ शाळेचा इतका टोकाचा द्वेष तुम्ही कसा करू शकता? ती शुद्ध वैचारिक लबाडी झाली.

सरकारी कार्यालयाच्या परिसरात पूजा करणे चुकीचे आणि धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असेल तर हज आणि बेथेलम (BETHLEHEM CHURCH) यात्रेसाठी भरघोस आर्थिक मदत देणे न्यायसंगत आहे का?”

या उलट इरोडमधील सीएसआय (CSI) चर्चने 800 कोटी रुपयांच्या 12.66 एकर जागेवर अतिक्रमण केले असून त्यांच्याकडे मालकीचा दावा करण्यासाठी पुरेशी कागदपत्रे देखील नाहीत. या मालमत्तेचा काही भाग ब्रिटिशांनी 1905 मध्ये लंडन मिशनला भाड्याने (Lease) दिला होता. नंतर हि जागा चर्च ऑफ साउथ इंडियाकडे हस्तांतरित केली गेली. त्यांनी हळूहळू शैक्षणिक संस्था,अनधिकृत हॉस्टेल..इत्यादी बांधण्यासाठी आजूबाजूच्या जमिनीवर अतिक्रमण केले. भाड्याने दिलेली जागा अन्य संस्थेला कायद्याने हस्तांतरित करता येते का?

इरोड कोट्टई मरिअम्मन मंदिर भक्त संघटनेने ह्या अतिक्रमणाविरोधात मद्रास उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. अलीकडेच मद्रास उच्च न्यायालयाने निकाल दिला की सीएसआय चर्चने खरोखरच मालमत्तेवर अतिक्रमण केले आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना ती परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

यावर मात्र डीएमके मूग गिळून आहे… कारण वोटबँक ?

डीएमके आमदार कलाराशी नटराजन (Kalarasi Natarajan) यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात म्हटलं होतं, ‘हिंदुत्वाला धर्म म्हटलं जाऊ शकत नाही. कारण त्याचं अस्तित्व केवळ काही शतकांपूर्वीपासूनच आहे.आपण सगळे शैव आहोत आणि त्यात जास्त महत्त्वाचं हे आहे, की आपण तामिळ आहोत.’ हे यांचे लॉजिक !

डीएमकेने आपले आर्य द्रविड दुहीचे राजकारण वेळीच आवरावे.

पवित्र यज्ञात विघ्न आणण्याचे दुष्कृत्य डीएमकेच्या गुंडानी केले आहे पण याद राखा, भगवंताने श्रीमद् भगवद्गीतेत स्पष्टपणे सांगितलेले आहे…

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥4-7॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥4-8॥

सावधान डीएमके… नाहीतर तुमची निशाणी असलेला उगवता सूर्य अस्ताला जायला वेळ लागणार नाही…

https://hindupost.in/dharma-religion/dmk-mp-offended-by-bhumi-puja-at-land-given-by-shaivite-math-for-government-project/

Back to top button