EnvironmentNews

भाग्यसूर्य तळपत राहो..

अक्षयऊर्जाच बनवणार भारताला विश्वगुरू

भारताने वाचवले ३४ हजार कोटी रुपये! सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करून इंधन खर्चात केली मोठी बचत

भगवान सूर्यनारायण समस्त मानवजातीला पुरून उरेल इतकी ऊर्जा (solar energy )दररोज देतात पण (नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे ) आमचीच झोळी फाटकी होती.परंतु राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेले सरकार आल्यानंतर परिस्थितीत आमूलाग्र बदल झालेला आपण पाहतोय.भारत देशाच्या विद्युत ऊर्जेच्या गरजा खूप जास्त आहेत; नवीकरणीय ऊर्जास्रोतांचा वापर करून अतिरिक्त क्षमता निर्माण करण्यावर विद्यमान सरकारचा भर कौतुकास्पद आहे.

सौरशक्तीद्वारे वीजनिर्मिती करून भारताने यंदाच्यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत इंधनावरील खर्चात ३४ हजार कोटी रुपयांची, तसेच १९.४ कोटी टन कोळशाची बचत केली आहे. ऊर्जाक्षेत्रात काम करणाऱ्या तीन संस्थांनी तयार केलेल्या ऊर्जाक्षेत्रात काम करणाऱ्या एनर्जी थिंक टँक एम्बर, सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर आणि इन्स्टिट्यूट फॉर एनर्जी इकॉनॉमिक्स अँड फायनान्शियल अनालिसिस यांनी हा प्रसिद्ध केला आहे.

जगभरातील दहा महत्त्वाच्या देशांपैकी भारत, जपान, चीन, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम हे पाच देश आशिया खंडात आहेत. सौरशक्तीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती करणाऱ्या सात आशियाई देशांमध्ये भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, फिलीपिन्स, थायलंड या देशांचा समावेश होतो. त्यांनी यंदाच्या वर्षी जानेवारी ते जून महिन्याच्या कालावधीत सौरशक्तीव्दारे वीजनिर्मिती करून जीवाश्म इंधनांवरील खर्चात २७ लाख कोटी रुपयांची बचत केली आहे.

चीन आघाडीवर

भारतासह ज्या सात देशांनी सौरशक्तीव्दारे वीजनिर्मिती करून इंधनावरील खर्चात जी बचत केली त्यामध्ये चीनचा सर्वाधिक वाटा आहे.चीनमध्ये विजेच्या एकूण मागणीपैकी ५ टक्के वीज सौरशक्तीव्दारे तयार केली जाते. त्यामुळे कोळसा व वायूवर होणाऱ्या खर्चात यंदा चीनने १ लाख ७१ हजार कोटी रुपयांची बचत केली. त्यानंतर सौरऊर्जेच्या माध्यमातून इंधन खर्चात कपात करण्यात जपानने दुसरा क्रमांक आणि भारत तिसऱ्या स्थानी आहे.

वीज उत्पादनात बचत केलेले काही देश पुढील प्रमाणे, १३००० कोटी – व्हिएतनाम, ६३७ कोटी- फिलीपिन्स,१२००० कोटी- दक्षिण कोरिया

Light bulb with growing tree. Ecological friendly and sustainable environment

भारत (india) हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा वीज उत्पादक देश आहे. ३० जूनपर्यंत भारतातील राष्ट्रीय विद्युत ग्रीडची स्थापित क्षमता ४०३.७५९ ‘गिगा वॅट’ इतकी प्रचंड आहे. कोळशावर चालणारे ऊर्जा प्रकल्प पर्यावरण प्रदूषित करतात हे तथ्य असूनही, आम्ही आमच्या गरजांसाठी त्यांच्यावर अवलंबून आहोत.अणुऊर्जा चांगला पर्याय आहे पण त्याचा मेन्टेनन्स फार खर्चिक आहे. पवनचक्की देखील आपण सर्वत्र उभारू शकत नाही म्हणूनच सौरऊर्जाच उपयुक्त पर्याय आज आपल्यापुढे आहे.

फक्त सहा महिन्यात जर आपण ३५००० कोटी वाचवत असू तर आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे यात शंका नाहीं. आपला प्रचंड पैसा परकीय इंधन आयातीवर खर्च होतो.आम्ही जीवाश्म इंधन मोठ्या प्रमाणात आयात करतो, ज्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो. कारण, ते आपले चलन कमकुवत करते आणि प्रदूषणाचा एक प्रमुख स्रोत आहे. पेट्रोल असो की कोळसा आणि आता युरेनियम.सौदी,इराक,इराण,रशिया,कॅनडा,ऑस्ट्रेलिया … आदींचे “नखरे” आपल्याला भोगावे लागतात.यावर उपाय एकच आत्मनिर्भर भारत…

इलेक्ट्रिक वाहने, ग्रीन हायड्रोजन, बायोगॅस, इथेनॉल,मिथेन या उर्जेच्या अक्षय स्रोतांना महत्त्व देण्याच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था उभारण्यास, रुपया मजबूत करण्यास ,प्रदूषण कमी करण्यास आणि हा देश परम वैभवावर नेण्यास मदत होईल.

वरील विवेचनावरून आपल्या लक्षात आलेच असेल की बलशाली,संपन्न भारतासाठी “आत्मनिर्भर” होणे किती आवश्यक आहे..

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

Back to top button