NewsPolitics

ट्वीटर नरमले; सरसंघचालकांसह सर्व वरिष्ठांची ट्वीटर हँडल पुन्हा व्हेरिफाईड

नवी दिल्ली – भारत सरकार आणि ट्वीटरमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ट्वीटरने आपला हेकेखोरपणा कायम ठेवत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक हँडलसह रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, डॉ कृष्ण गोपाल, सुरेश सोनी, सुरेश उपाख्य भय्याजी जोशी आणि अरुण कुमार इत्यादी वरीष्ठ अधिकाऱ्यांची हँडल्स अनव्हेरिफाईड केली असल्याचे शनिवार, ५ जून रोजी लक्षात आले. तसेच या कृतीमागच्या कारणांचा कोणताही अधिकृत खुलासा ट्वीटरने केला नाही. परंतु ट्वीटर युजर्सचा रोष उफाळलेला रोष लक्षात घेऊन शनिवार संध्याकाळपर्यंत ही सर्व हँडल्स पुन्हा एकदा व्हेरिफाईड करण्यात आली.

भारत सरकारने गेल्या काही दिवसांपासून ट्वीटरबाबत कठोर धोरण स्वीकारले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा भारताच्या कायद्याचे पालन करा अशी सूचना ट्वीटरला करण्यात आली होती. यावर योग्य कारवाई करण्याऐवजी उलट देशातील महत्त्वपूर्ण हँडल्स अनव्हेरिफाईट करण्याचा आगाऊपणा ट्वीटरने केला. संतापलेल्या नेटिझन्सनी #BanTwitterInIndia #blueTick #TwitterBanInIndia अशा हॅशटॅहसह ट्वीट्सचा पाऊस पाडला. त्यांच्या रोषाचा दणका बसलेल्या ट्वीटरने दुपारी व्यंकय्या नायडू यांचे ट्वीटर हँडल व्हेरिफाईड केले. त्यानंतर काही वेळाने अन्य सर्व हँडल्सदेखील व्हेरिफाईड करण्यात आली.

**

Back to top button