News

महाराष्ट्राच्या दिंडीचे वारकरी.. पद्म पुरस्काराचे मानकरी.. भाग ९

padma-awards 2024 Maharashtra

महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराने सन्मानित १३ महानुभावांचा अल्प परिचय सांगणारी १३ भागांची विशेष मालिका..

पद्मश्री पुरस्कार..

डॉ. चंद्रशेखर मेश्राम (चिकित्सा )

नागपूरचे प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना भारत सरकारने मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. गेल्या तीन दशकांहून आधिक काळ वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना या सन्मानेने सन्मानित करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रात खास करून मेंदूशी संबंधित रुग्णांसाठी काम करताना मेश्राम यांनी त्यांच्यावर केवळ उपचारच केले नाही, तर त्यांचा योग्य आणि आवश्यक मार्गदर्शनही केलंय. त्यासंदर्भात माझ्या कामाचा भारत सरकारने गौरव केल्याबद्दल सरकारचे, समाजाचे आभार असल्याची भावना डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केली आहे.

सध्याच्या काळात आणि सतत होत असलेल्या आधुनिकीकरणात शारीरिक आरोग्यसह मानसिक आरोग्य ही तेवढाच महत्त्वाचा आहे. गेले अनेक वर्ष लोकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी मेंदू संबंधी रोगांबद्दल जनजागृतीसाठी सतत कार्य केले असून भविष्यात आणखी जोमाने हे काम करणार असल्याची ग्वाही देखील पद्मश्री डॉ. मेश्राम यांनी दिली.

123 देशात भारताचे नेतृत्व करणारे पहिले भारतीय

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पद्म पुरस्कार जाहीर केले असून एकूण 110 जणांचा गौरव करण्यात आला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्रीने सन्मानीत करण्यात आले असून त्यामध्ये नागपुरातील ख्यातनाम न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचा देखील समावेश आहे. वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून 36 वर्षांच्या अविरत वैद्यकीय आणि सामाजिक सेवेसाठी मिळालेल्या या सन्मानाबद्दल सरकारचे आणि समाजाचे आभार असल्याची भावना डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांनी बोलतांना व्यक्त केला आहे.

वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी या 123 देशांचे सदस्य असलेल्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी विभागाचे डॉ. मेश्राम हे 2017 पासून अध्यक्ष आणि 2022 पासून संघटनेचे विश्वस्त म्हणून निवडले गेले आहे. ही उपलब्धी मिळविणारे ते पहिले भारतीय डॉक्टर ठरले आहेत. त्यामुळे डॉ. मेश्राम यांच्या कर्तृत्व आणि कौशल्याचा ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.

डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी मेंदूच्या आरोग्याविषयी जागरुकता, नागरिकांना न्यूरोलॉजिकल रोगांबद्दल ज्ञान देऊन सक्षम बनवण्याच्या देशव्यापी मोहिमेचे नेतृत्व केले आहे.

क्रमशः

Back to top button