“सीमा”वाद आणि षडयंत्र…
शीर्षक वाचून आपल्या लक्षात आलेच असेल, एक तथाकथित प्रेम-प्रकरण सध्या सगळीकडे भलतंच गाजत आहे, न्युज मीडिया, सोशल मीडिया.. सर्वांनाच सीमा हैदर प्रकरणाने झपाटलेलं आहे…
सीमा हैदर (seema haider) नावाची इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी( islamic republic of pakistan) महिला आपल्या चार मुलांसोबत आपल्या प्रियकरासाठी नेपाळहून अवैध मार्गाने भारतात येते. तिची 4 मुले आणि ती असे 5 इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी नागरिक अवैध मार्गाने भारतात येतात. केवळ येतात एवढेच नव्हे तर भारताची नागरिकता मिळवण्यासाठी महामहिम राष्ट्रपतींकडे दयायाचना करतात (president of india)… विशेष म्हणजे प्रशासनाला जाग येण्यापूर्वी भारतीय मीडिया आणि स्थानिक त्यांना सेलिब्रेटी ठरवतात. या सगळ्या प्रकरणाला Love Without Borders एक गोंडस नावं दिल जात.
‘गदर’ एक प्रेम कहाणी या चित्रपटाचा दाखला देवून ही बाई भारतात शिरते. हे सगळं नाट्य बेमालूमपणे घडत..
सीमा हैदर ही इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या ISI ची एजंट नसेल कशावरून ? असा सर्वसामान्य जनतेच्या मनात उभा राहिलेला प्रश्न आहे.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या RBI च्या रिपोर्टनुसार,आपला forex reserves (परकीय गंगाजळी) जवळपास ६०० बिलियन डॉलर च्या पुढे गेला आहे.संपूर्ण इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची किंमत देखील तेवढी भरणार नाही,इतका आपला फक्त forex reserves आहे.१९४८ ते १९९९ इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने भारताशी ४ वेळा उघड व छुपे युद्ध करून पाहिले परंतु प्रत्येक युद्धात भारतीय सेनेने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आपण समोरासमोर भारतीय सैन्याशी लढणे तर दूरच, साध्या बंदुकीच्या गोळ्या देखील आपल्याकडे उपलब्ध नाही याची संपूर्ण कल्पना इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला आहे. म्हणूनच अशा नानाविविध प्रकारचे षडयंत्र इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान नेहमीच करत आला आहे.सीमा हैदर हा त्या छद्मी षडयंत्राचा( conspiracy) भाग नसेल कशावरून ?
कोण आहे ही,”सीमा हैदर”..
सीमाच्या म्हणण्यानुसार;- सीमा हैदर ही मूळची इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील रहिवासी असून तेथेच सीमाचे पाचवी पर्यंतचे शिक्षण झाले आणि २०१४मध्ये गुलाम हैदर सोबत तिचा प्रेम-निकाह (love marriage) झाला.घरच्यांच्या विरोधामुळे गुलाम हैदर ने सीमाशी court marriage केले होते. वयाच्या १५ व्या वर्षीच तिला पहिलं अपत्य झालं. त्यानंतर ती चार मुलांची आई देखील झाली. गुलाम हैदर कराचीमध्ये टाईल्स बनवण्याचं काम करत होता, त्यानंतर २०१९ मध्ये तो कामानिमित्त सौदी अरेबियाला( saudi arabia) गेला. गुलाम हैदर परदेशात गेल्याने सीमा मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवू लागली. तेव्हा तिने PUBG खेळायला सुरुवात केली.
सचिनशी ओळख आणि लग्न..
२०१९ साली PUBG खेळताना सीमाने पहिल्यांदाच भारताच्या उत्तर प्रदेशच्या गौतम बुद्ध नगरमधील सचिन मीणासोबत ऑनलाईन PUBG खेळायला सुरुवात केली. PUBG खेळताना दोघांमध्ये बोलणं वाढलं. दोघांनी इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर चॅटिंग,व्हिडिओ कॉलिंग सुरू झालं आणि दोघांमधील जवळीक वाढली.. अन् एके दिवशी त्यांनी प्रत्यक्षात भेटायचं ठरवलं.
२०१९ नंतर जवळीक वाढत गेली. दोघांनी भेटायचं ठरवलं आणि त्यासाठी प्रयत्न सुरू केले. पार्सपोर्ट काढण्यासाठी सीमाची हालचाल सुरु झाली मात्र काही केल्या पासपोर्ट मिळेना.शेवटी एकदाचा पासपोर्ट मिळाला मग सीमाने टुरिस्ट व्हिसा मिळवून UAE मार्गे नेपाळला (nepal) भेटायचं ठरवलं.आपल्या चार मुलांना बहिणीकडे सोडून सीमा नेपाळला आली आणि त्यांची पहिली भेट झाली. तो दिवस होता १० मार्च २०२३. त्यांनी पहिल्याच भेटीत, १३ मार्चला दोघांनी पशुपतीनाथ मंदिरात हिंदु पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर सीमा पुन्हा १७ मार्चला कराचीला गेली. ती भारतात येण्याच्या आणाभाका घेऊनच !
कराचीला परत आल्यावर सीमाने ट्रॅव्हल एजंटशी संपर्क साधला. ती तिच्या ४ मुलांसह भारतात कशी जाऊ शकते, यासाठी तिने प्रयत्न सुरू केले. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानातून भारताच्या व्हिसासाठी प्रयत्न केले. मात्र व्हिसा नाकारला गेला. त्यानंतर तिला YOUTUBE वरून कळलं की ती नेपाळमार्गे भारतात सहज प्रवेश करू शकते. सीमा खुश झाली पण या सगळ्यासाठी खूप पैसा खर्च होणार होता.म्हणून सीमाने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मधील आपली स्थावर मालमत्ता १४ लाखांना विकून, सीमा कराचीमधून भारताकडे यायला निघाली. तेव्हा तिच्याकडे फक्त ३०० डॉलर म्हणजे २५ हजार भारतीय रुपये उरले होते.
सीमाच्या म्हणण्यानुसार, ती १० मे रोजी दुबई मार्गे काठमांडूला पोहचली. तिने ४ मुलांसह एका व्हॅनमधून काठमांडू ते पोखरा असा प्रवास केला. रात्र झाल्यामुळे ती तिथेच थांबली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोखरा येथून दिल्लीला जाण्यासाठी बस पकडली. FIR नुसार,१३ जुलैच्या रात्री सीमा हैदर आपल्या ४ मुलांसोबत यमुना एक्सप्रेसवेवर उतरली. तिथे सचिन तिची वाट पाहत होता. आपण नेपाळहून भारतापर्यंत अवैधरित्या प्रवास केल्याचं सीमा मान्य करते.
सीमा,सोशल मीडिया ट्रायल आणि अटक..
सोशल मीडियावर सीमाचे धाडस, प्रेम यांचे गुणगान गायले गेले, तीला सती-सावित्री, आदर्श भाभी, अशा सगळ्याच विशेषणांनी नावाजले गेले. तिचा आधीचा नवरा असणाऱ्या गुलाम हैदरने तिची आणि आपल्या मुलांची मागणी भारत सरकारकडे केली, तिच्या मागणीसाठी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधून भारताला धमक्याही आल्या, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मधील इस्लामिक माफियांच्या टोळ्यांकडून हिंदूंची मंदिरेही सीमाचे निमित्त करून रॉकेट डागून तोडण्यात आली.
इतके होऊन देखील, सीमा आपले सर्वस्व सोडून भारतात आपल्या प्रियकराकडे आली आहे. त्यामुळे तिचा त्याग मोठा आहे, असं काही नेटकरी म्हणतात. म्हणूनच देशाच्या सुरक्षिततेपेक्षा त्यांना देशाने तिचा स्वीकार करणे गरजेचे वाटते,या तथाकथित सहिष्णूंना वाटते.की सचिन भारताचा नागरिक असून त्याने या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी सीमाला सगळे कायदे-नियम मोडून आपलसं केलं आहे, तेही समर्थनीयच आहे
सचिन आणि सीमा रजिस्टर लग्न करण्यासाठी नोएडातील एका वकिलाकडे गेले दोघांची कागदपत्रे तपासल्यावर सीमाच्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी शिनाख्ती कार्ड (पाकिस्तानचे आधार कार्ड ) वरून ती इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी नागरिक वकिलाच्या लक्षात आले त्याने ताबडतोब नोयडा पोलिसांना खबर दिली. त्यानंतर या दाम्पत्याला अटक करण्यात आली. सीमावर व्हिसा नसताना भारतात प्रवेश करण्याचा आरोप करण्यात आला.अटकेनंतर सीमा आणि तिला आसरा देणाऱ्या सचिनला नोएडाच्या लुक्सर जेलमध्ये नेण्यात आलं.७ जुलै रोजी त्या दोघांना जामीन मिळाला.सीमाला ३०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसंच कोर्टाने हे प्रकरण सुरू असेपर्यंत सीमा आपली राहण्याची जागा बदलू शकत नाही व कोर्टाच्या पूर्वपरवानगीशिवाय देश सोडू शकत नाही.अश्या अटी घालण्यात आल्या.
सीमा खरंच एक ISI गुप्तहेर आहे का याचा तपास UP ATS करत आहे. त्यांचा तपास पूर्ण होईपर्यंत सर्वानी धीर धरणे आवश्यक आहे. तरीही एक सजग भारतीय नागरिक म्हणून आपल्या मनात काही प्रश्न उभे राहतातच ..
DRDO चे वरिष्ठ अधिकारी प्रदीप कुरुलकर यांना इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या ISI ने honey trap मध्ये अडकवण्याच्या प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. या पार्श्वभूमीवर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी सीमा हैदर विषयी भारतीय समाजमनात साशंकता निर्माण झाल्यास ते स्वाभाविकच म्हणावे लागेल.
१) सोशल मीडियावर (social media) मरियम खान नावाने अकाउंट उघडणाऱ्या सीमाने सीमा हे हिंदू नाव जाणीवपूर्वक घेतले आहे का ?
२) सीमाच शिक्षण खरंतर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानातील शिक्षण पद्धतीच्या पाचवी पर्यंत झालं आहे. परंतु तिचे कॅमेरा समोरचे सफाईदार हिंदी व इंग्रजी वागणे-बोलणे,हे तिला विशेष प्रशिक्षण मिळाल्याशिवाय अशक्यप्राय वाटते ?
३) आपल्या पेक्षा ४ वर्षांनी लहान असलेल्या सचिन बरोबर संसार सुरु केल्याबरोबर तिचे उत्तर भारतातील हिंदू रितीरिवाजाप्रमाणे साडी नेसणे ,डोक्यावरून पदर घेणे ,कुंकू लावणे ,तुळशीची पूजा करणे आश्चर्यकारक वाटते. ९६ % मुसलमान आबादी असलेल्या कराचीत वाढलेली सीमा ट्रेनिंगशिवाय असे हिंदू रितीरिवाज पाळणे अशक्यप्राय वाटत नाही का ?
४) सीमाकडून पोलिसांनी ४ मोबाईल फोन, ५ इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे अधिकृत पासपोर्ट तसेच एक कोरा पासपोर्टही जप्त केला आहे. पासपोर्टबाबत चौकशीत तिने सांगितलं की, “नेपाळचा विजा घेण्यासाठी सीमा गुलाम हैदर नावाने अर्ज केला होता. विजा न मिळाल्याने पुन्हा फक्त सीमा नावाने अर्ज केला.
५) UP ATS च्या चौकशीत असे देखील समोर आले की, सीमाने ज्यांच्याशी संपर्क साधला तो सचिन हा पहिला व्यक्ती नाही, याआधीही सीमाने भारतातील काही लोकांशी PUBG खेळण्याच्या निमित्ताने संपर्क साधला होता, ज्यातील बहुतांश दिल्ली-एनसीआरमधील होते.सीमाला भारताची राजधानी असलेल्या दिल्ली-एनसीआरमध्ये एवढा रस का असावा ?
६) कराची-दुबई-काठमांडू -पोखरा -दिल्ली हा प्रवास सीमाने आपल्या ४ मुलांना घेऊन कोणत्याही पुरुषाच्या सोबती शिवाय केला. विशेषतः काठमांडू ते दिल्ली हा रस्त्याने केलेला प्रवास एकट्या पाचवी पास इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी महिलेसाठी अशक्यप्राय वाटतो त्यातही भारताच्या हद्दीत कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय ५ जणांनी केलेला प्रवेश मनाला पटत नाही. भारत नेपाळ सीमेवर तिला नक्कीच एखाद्या एजंटचे संरक्षण असले पाहिजे आणि हा एजंट फक्त ट्रॅव्हल एजंट नसून ISI चा एजंट असावा अशी दाट शंका येते.
७) सीमाच्या ४ मुलांचा सांभाळ किराणा दुकानात काम करून उदरनिर्वाह करणारा, महिना १४ हजार कमावणारा सचिन कसा सांभाळ करणार आहे ? सीमाच्या हे लक्षात आले नसेल ? की भारतीय गुपचर यंत्रणांना संशय येऊ नये ISI ने सीमाला ४ मुलांसोबत भारतात धाडले आहे ?
८) सीमाने या प्रवासादरम्यान नेपाळमधून दुसऱ्यांकडून हॉट-स्पॉट घेऊन सचिनशी संपर्क साधलेला आहे. यावरून तिची आधुनिक तंत्रज्ञानाशी असलेली ओळख व चलाखीचा प्रत्यय येतो.ही एखाद्या गुप्तचराला साजेशी चलाखी आहे.
९) चॅनेलच्या कॅमेऱ्यासमोर सीमाचे बेधडक उत्तरे देणे, काहीवेळा पत्रकारांना प्रतिपक्ष करणे, वेळ पडल्यास रडणे,चेहरा भोळा भाबडा करणे व भारतीय नागरिकत्वासाठी अगदी भारताच्या राष्ट्रपतींकडे आर्जव करणे. हे ती इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी पाचवी पास मुस्लिम वातावरणात वाढलेल्या महिलेचे मुळीच लक्षण नाही. सीमा “बनेल” वाटते. हे बनेलपण ISI ने पढवले असावे ?
१०) इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधून अनेक पाकिस्तानी मुस्लिम नागरिक वैध मार्गाने भारतात येतात मात्र व्हिसा संपला तरी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानात परतत नाहीत अनेकवेळा भारतीय यंत्रणांना त्यांचा सुगावा देखील लागत नाही. सचिन आणि सीमा आपले लग्न रजिस्टर न करता एकत्र राहिले असते तर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी सीमांचे बिंग कधीच फुटले नसते. अश्या किती सीमा भारतात सुखाने नांदत असतील याची नुसती कल्पना आपली झोप उडवणारी आहे. अश्या भारतात लपलेल्या अनेक सीमांवरून लक्ष उडवण्यासाठी सीमा हैदर कांड ISI ने सुनियोजित रित्या घडवून तर आणले नसेल ना ?
सीमा हैदरचे सत्य UP ATS लवकरच शोधून काढेल मात्र तिची चौकशी करणे ATS सारख्या तपास यंत्रणेला आवश्यक वाटते यातच सर्वकाही आले.
मागील दहा वर्षात इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे जिहादी, आतंकवादी मॉडेल जगभरात expose झाले आहे.आता भारताविरुद्ध आतंकवादी कारवाई करणे म्हणजे स्वतःचा आत्मघात हे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने कधीच ओळखले आहे. म्हणूनच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने भारताविरुद्ध cyber warfare,social media attack,honey trap..असे नाना प्रकारचे छद्मी युद्धतंत्र राबविले आहे.
समोरा-समोर लढण्याची लायकी नसल्याने तसेच आत्मनिर्भर भारताची दिवसेंदिवस होणारी प्रगती पाहून फुटीच्या उंबरठ्यावर असलेला इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान पुरता वैतागलेला आहे.म्हणूनच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला बायकांच्या बुरख्याअडून आपले छद्म षडयंत्र राबवावे लागत आहे.
रामदास स्वामी म्हणतात त्या प्रमाणे आपण अखंड सावधान असावे हे मात्र निश्चित.
शेवटी इतकंच म्हणू इच्छितो की,
अगणित बलिदानों से अर्जित यह स्वतंत्रता, अश्रु स्वेद शोणित से सिंचित यह स्वतन्त्रता
त्याग तेज तपबल से रक्षित यह स्वतंत्रता, दु:खी मनुजता के हित अर्पित यह स्वतन्त्रता।
इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो, चिनगारी का खेल बुरा होता है
औरों के घर आग लगाने का जो सपना, वो अपने ही घर में सदा खरा होता है।
-अटलबिहारी वाजपेयी