NaxalismNews

नक्षलवाद्यांचा रक्तरंजित इतिहास..:- भाग २

नक्षलवादी चळवळ( Naxalwadi movement) म्हणजे काय ?

पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्याच्या सिलीगुडी पोटविभागात आणि हिमालयाच्या पायथ्याशी नक्षलबारी हा सु. २०७ चौ. किमी.चा प्रदेश आहे. या भागात एकूण ६० खेड्यांचा अंतर्भाव होतो. तेथील वस्ती बव्हंशी संथाळ, ओराओं, मुंडा आणि राजवंशी या आदिवासी जमातींची आहे. मे १९६७ मध्ये मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पक्षाच्या नक्षलबारी शाखेने मध्यवर्ती पक्षाला डावलून येथे आदिवासींचा सशस्त्र उठाव केला. नक्षलवादी उठावाची ही सुरुवात होती. ‘सशस्त्र क्रांतीने सत्ता संपादन’ आणि ‘माओ-त्से-तुंग हे आमचे प्रमुख’ या त्यांच्या घोषणा आणि चिनी सरहद्दीची समीपता यांमुळे नक्षलवादी उठावाकडे सर्व देशांचे लक्ष वेधले गेले. या उठावामागील विचारप्रणाली “नक्षलवाद” म्हणून ओळखली जाते.

‘नक्षलवादाची निश्चित अशी व्याख्या करता येत नसली तरी ‘नक्षलवाद’ ही चळवळ किंवा विचार देशातील राजकीय आणि सामाजिक परिघात प्रचलित झाला, त्यामागील उत्पत्तीचा स्रोत म्हणजे प बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील ‘नक्षलबारी’ या गावातून ही चळवळ जमीनदारांतर्फे होणान्या शोषणाच्या विरोधात उभी झाली. ज्या गावातून ही चळवळ किंवा विरोध सुरु झाला, त्या गावाच्या नावानेच पुढे ही चळवळ नावारूपाला आली आणि त्याला नक्षलवाद’ असे म्हटले जाऊ लागले.

बंदुकीच्या बळावर अन्याय दूर करायचा, असा अघोरी विचार घेऊन ही चळवळ फोफावत गेली.

नक्षलवादाने पुढे चळवळीचे रूप धारण केले. नक्षलवादी चळवळीने माओवादी विचार घेऊन आपली व्यापकता वाढवली, माओवादाचा शक्ती, संघर्ष, हिंसाचार या तत्त्वांवर विशास होता. ह्याच हिंसाचाराचा आधार घेऊन नक्षलवादी चळवळ आपली वाटचाल करत आहे. आपल्या सोईनुसार नक्षलवाद्यांनी माओबाद स्वीकारून त्याला आपल्या अमानवी कृत्यांची आणि विचारांची जोड दिली. प्रस्थापितांच्या विरोधात लढून त्यांच्यात दहशत निर्माण करणे आणि होऊ घातलेल्या विकासात अडसर निर्माण करणे या तत्त्वांना आणि वर्तनाला पुर ‘नक्षलवादी चळवळ’ असे नाव पडले.

नक्षलवादी विचाराला कार्ल माक्संप्रमाणे कामगार आणि भांडवलदार यांच्यामधील वर्गसंघर्ष अपेक्षित नाही; तर समाजातले सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विषमतेच्या परिस्थितीला अनुसरून आणि शोषित समुदायाला संघटित करून आपला विचार पुढे नेणे. सोबतच सांस्कृतिक दृष्ट्या दुर्गम भागातील जमातींना संघटित करून पर्यायी सरकार (समांतर सरकार) स्थापन करणे, तसेच प्रस्थापित शासनाला विरोध करणे, ही नक्षलवादी चळवळीची विचारधारा आहे.

नक्षलवादी चळवळ राज्यातील लोकांच्या विकासासाठी लागणारी आर्थिक स्वरचना निर्माण करीत नाही; तर उत्पादन, वितरण आणि व्यापारी, व्यावसायिक संघटन विकसित न करता, प्रस्थापित व्यवस्थेतील अर्थरचनेतून अनधिकृत खंडणी, पैशाच्या रूपाने कर जमा करून पर्यायी सरकार चालविते. पर्यायी सरकार कुठल्याही कल्याणकारी सेवा, सुविधा पुरवीत नाही; तर संघटितपणे स्थानिक, प्रांतीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंसक चळवळीचे सहकार्य घेऊन कार्य करणारी हिंसक लढा, यंत्रणा म्हणजे नक्षलवाद होय.

नक्षलवादी चळवळीमध्ये कार्यरत कार्यकर्ते त्यांच्या चळवळीला एक विचारसरणी मानतात. ही विचारसरणी मूलतः माओवादी विचारसरणीशी साधर्म्य ठेवणारी आहे. कार्ल मार्क्सचा विचार १९१७ मध्ये लेनिनने रशियात ‘बोल्शेविक क्रांती’ करून प्रत्यक्षात उतरविला. त्यानंतरच्या काळात चीनमध्ये १९४९ मध्ये माओत्से तुंग ने मार्क्सचा( karl marx) हा सिद्धान्त’ चीनमध्ये अनुसरून शेतमजुरांना संघटित केले आणि त्यातून आपल्या माओवादी विचारांची रुजवणूक करून त्याने चीनमध्ये क्रांतीच्या दुसऱ्या टप्यात ‘सांस्कृतिक क्रांतीच्या गोंडस नावाखाली लाखो निष्पाप,बुद्धिवंतांचे हत्याकांड घडवून आणले. शिस्तपालन नावाखाली लाखो श्रमजीवींना श्रम छावण्यात डांबण्यात आले. याच माओवादी, साम्यवादी विचारांची भारतीय आवृत्ती म्हणजे नक्षलवाद होय.

Back to top button