खुडूस फाट्यावर रंगलेल्या माऊलींच्या दुसऱ्या गोल रिंगणात अश्वांच्या टापांनी भक्तीचा धुरळा आकाशी उधळला. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने जोर धरला आणि वारीच्या वेळापूर मुक्कामाचा टप्पा भक्तिमय झाला. संसारात रमणाऱ्या आणि संत परंपरेच्या जवळ असलेल्या या वारकऱ्यांच्या भक्तीचा मार्ग तो काय…जाणून घेऊया..