तरुण पिढीत वाढणारी व्यसनाधीनता जगभराची डोकेदुखी बनली असताना महाराष्ट्राच्या आळंदीत मात्र हजारो तरुण कडक शिस्त पाळत आहेत. या तरुणांचा दिवस पहाटे ३ वाजता सुरु होतो आणि जेवण समाजात माधुकरी मागून होतं. आधुनीक तंत्रज्ञानासोबतच शिस्त, भक्ती, अध्ययन आणि प्रबोधनाची तपस्या करणाऱ्या आळंदीतील वारकरी गुरुकुलातील तरुणांचे जीवन कसे आहे, जाणून घेऊया या व्हिडिओतून.