HinduismNews

अवघा रंग एक झाला.. भाग २१..

“अवघा रंग एक झाला”.. या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज…

कां संत ऐसे बोलती, ना देशप्रेमी व्हा तुम्हा ?
कां वेद वदती ऐसीये की, मातृभू सेवू नका ?
कां ग्रंथ वदती ऐसीये की, राष्ट्रभू पूजा नका ?
कां राम ऐसे बोलती, देशाहूनी मी वेगळा ?

अर्थात :- देवभक्तीतून राष्ट्र भक्तीचे हे जागरण अपूर्व असे आहे. संत, वेद, धर्मग्रंथ तसेच श्रीराम यांच्या शिकवणीत राष्ट्रप्रेमाला विरोध नाही. उलट धर्म, समाज आणि मातृभूमीप्रती प्रेम, कर्तव्य, सेवा आणि समर्पण याचे महत्व आहे. प्रत्येकाने राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे.

महापुरूषांचे जीवन,विचार व कार्य हे तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात घडत असते.देश पारतंत्र्यात असताना ,स्वातंत्र्य आंदोलनाचा तो कालखंड. या पाश्र्वभूमीवर तुकडोजी महाराजांनी भारतीय समाजमनाची प्रकृती व स्वभाव लक्षात घेऊन आपल्या संस्कृतीमधील प्रतीकांचा आधार घेऊन समाजाचे संघटन उभे केले.

१९३२ ला सत्याग्रहींसमोर राष्ट्रसंतांनी जे भजन सादर केले ते प्राचीन भारतीय सांस्कृतिक राष्ट्राचे जागरण होते..

प्यारा हिन्दुस्तान है,गोपालोंकी शान है।
वीरोंका मैदान इसमें, भक्तोंके भगवान है ।
आवो इसे जगायेंगे, भारतको बदलायेंगे ।
बालवीर उठो तुम तो , ऋषितुल्य संतान है॥

अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला
Back to top button