माऊलींची पालखी पंढरीनगरीत दाखल झाली. त्याआधी अंतिम उभ्या रिंगणातील मानाच्या अश्वांची दौड, टापांनी उडालेली पवित्र धूळ आणि लाखो वैष्णवांच्या विठ्ठलनामाच्या जयघोषाने अवघा परिसर माऊलीमय झाला . चंद्रभागा दिसली, मंदिराचा कळस नजरेस पडला आणि थकलेली पाऊले नाचू लागली.