विठुरायाच्या पंढरीनगरीचा आणि मंदिराचा आता कायापालट होणार आहे. चंद्रभागा नदी निर्मल करण्यासाठी अद्ययावत परकीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या प्रकल्पानुसार पुरातन वैभवाचे जतन करण्यापासून ते वारकऱ्यांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्यापर्यंत अनेक स्तरांवर कामे होणार आहेत. विठुरायाच्या पंढरीला पुन्हा वैभव मिळणार आहे. पंढरी नगरीच्या पुनर्निर्माणासाठी आखलेल्या योजना, तरतूद आणि विकासाचा ओघ जाणून घेऊया..