घड्याळ्याच्या काट्यावर धावणा-या मुंबईकरांनाही विठ्ठलभक्तीची ओढ आहे. . नोकरी, व्यवसाय आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांमुळे पंढरीच्या वारीला जाता न येणारे असंख्य मुंबईकर आषाढी एकादशीच्या दिवशी वडाळ्यातील ऐतिहासिक श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतात.चला तर ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराचा इतिहास, त्यामागील परंपरा आणि मुंबईकरांच्या विठ्ठलभक्तीचा अनोखा वारसा जाणून घेऊया…