NewsPoliticsWorld

भारतासाठी “सोरोस” नव्हे .. सोरायसिस

गेल्या आठवडय़ात म्युनिक सुरक्षा परिषदेत (munich security conference 2023) जॉर्ज सोरोस (george soros) यांनी पंतप्रधान आणि अदानी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे भारतामध्ये सोरोस विरोधात मोठा प्रक्षोभ उडाला आहे.सोरोस ज्या मूल्यांच्या आधारावर ही पोपटपंची करीत आहेत, ती चर्चशी झालेल्या संघर्षावर आधारित आहे. भारतात त्याचा काही संबंध नाही. मात्र, ते काय समज किंवा गैरसमज पसरवू शकतात, याचा अंदाज आपल्याला येवू शकतो.

म्युनिक सुरक्षा परिषद

म्युनिक सुरक्षा परिषद (munich security conference ) हा जागतिक नेत्यांचा सुरक्षा समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक वार्षिक मंच आहे. १९६३ पासून दर वर्षी जर्मनीत म्युनिक येथे ही परिषद आयोजित केली जाते. आंतरराष्ट्रीय सुरक्षा समस्यांवर चर्चा करण्यासाठी ही जगातली एक अत्यंत महत्त्वाची आंतरराष्ट्रीय परिषद मानली जाते. या ‘एमएससी’मध्ये जागतिक राजकीय नेते आणि उद्योगपती, संरक्षण तज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ एकत्र येतात आणि ताज्या सुरक्षाविषयक मुद्दय़ांवर – दहशतवाद आणि आण्विक प्रसार ते सायबर हल्ले आणि हवामान बदल यांसारख्या धोक्यांवर चर्चा करतात.

जॉर्ज सोरोस कोण आहेत?

जाॅर्ज सोरोस : जन्म १९३०. सोरोस हे निश्चितच एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहेत. जॉर्ज सोरोस हे ९२ वर्षांचे आहेत (भारतात हे वय वानप्रस्थाश्रमाच असत अमेरिकेत मात्र दुसऱ्या देशात काड्या करण्याचे असावे), हंगेरियन-अमेरिकन अब्जाधीश गुंतवणूकदार, स्वतःला दानशूर म्हणवणारे आहेत. नाझी नरसंहारातून वाचल्यानंतर इंग्लंडमध्ये आश्रय घेऊन त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला. नंतर अमेरिकेत त्यांनी फायनान्समध्ये कारकीर्द सुरू केली. त्यांनी स्वत:चा हेज फंड स्थापन केला.

मुळ नाव : जाॅर्ज श्वार्ट्झ, ज्यू. (हिटलरनी ज्यूंना त्रास द्यायला सुरवात केल्यावर या तालेवार ज्यू कुटूंबानी आडनाव बदलून ‘सोरोस’ केलं) जन्मानी हंगेरीयन, कर्मानी अमेरीकन,जगातला एकोणतीसावा सर्वाधिक श्रीमंत,शेअरमार्केट मधे हेजफंड स्वरूपात गुंतवणुक करत पैसा कमावणारा अब्जाधीश आहे.

जॉर्ज सोरोसच्या वेबसाइटनुसार, त्यांचा जन्म १९३० मध्ये बुडापेस्ट, हंगेरी येथील ज्यू कुटुंबात झाला. तो ९ वर्षांचा असताना दुसरे महायुद्ध सुरू झाले. यावेळी हंगेरीमध्ये ज्यूंची हत्या करून त्यांना मारले जात होते. हे हत्याकांड टाळण्यासाठी सोरोसच्या कुटुंबीयांनी खोटे आयडी बनवले होते.१९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपले तेव्हा हंगेरीमध्ये कम्युनिस्ट सरकार स्थापन झाले. हीच वेळ होती जेव्हा सोरोस कुटुंबाने देश सोडण्याचा निर्णय घेतला.१९४७ मध्ये, सोरोस आपल्या कुटुंबासह बुडापेस्टहून लंडनला गेले.

लंडनला पोहोचल्यानंतर सोरोसच्या कुटुंबासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे जगायचे कसे ? यावेळी, सोरोस यांनी पैसे कमवण्यासाठी पोर्टर आणि वेटर म्हणून काम केले. यातून तो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील शिक्षणाचा खर्च भागवत असे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर जॉर्ज सोरोस १९५६ मध्ये लंडनहून अमेरिकेत आले. अमेरिकेत, सोरोस यांनी वित्त आणि गुंतवणूक क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्याच्यासाठी योग्य ठरला.

१९७३ मध्ये ‘सोरोस फंड मॅनेजमेंट’(soros fund) नावाने कंपनी स्थापन केली. यानंतर अमेरिकन शेअर बाजारात पैसे गुंतवायला सुरुवात केली. पुढील ६ वर्षे म्हणजे १९७९ पर्यंत, सोरोस इतके यशस्वी उद्योजक बनले की त्यांनी वर्णभेदाचा सामना करणाऱ्या कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली. तोपर्यंत तो जगातील सर्वात मोठा चलन व्यापारी म्हणून प्रसिद्ध झाला होता.

१९९२ : ‘बँक ऑफ इंग्लंड’चा नाश आणि जॉर्ज सोरोसची कमाई

१९९२ सालची गोष्ट आहे. युरोपीय देशांनी त्यांचे चलन मूल्य स्थिर आणि मजबूत करण्यासाठी विनिमय दर यंत्रणा सुरू केली होती. या अंतर्गत दोन किंवा अधिक देश त्यांच्या पैशाचे मूल्य निश्चित करतात. १९८९ पूर्वी जर्मनीचा विकास झपाट्याने होत होता, परंतु बर्लिनची भिंत पडल्याने येथील अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ लागली. त्याच वेळी, यूकेने चलनाचे मूल्य जर्मनीसह विनिमय दर यंत्रणेच्या अंतर्गत निश्चित केले. त्यामुळे जर्मनीचे कमकुवत चलन मजबूत होते.
जर्मनीचे चलन बळकट होणे तर दूरच, यूके पौंडचे मूल्यही घसरायला लागले. हे टाळण्यासाठी यूके सरकारने व्याजदर वाढवले. असे असूनही जर्मन चलनाचे मूल्य घसरत राहिले. त्याच वेळी, जॉर्ज सोरोस यांनी यूकेच्या चलनावर एक लहान स्थान घेतले.

१६ सप्टेंबर १९९२ रोजी, सेंट्रल बँक ऑफ जर्मनीने सहयोगी देशांना त्यांच्या चलनाचे मूल्य रीसेट करण्यास सांगितले. यानंतर यूकेने जर्मनीसोबतचा विनिमय दर यंत्रणा करार मोडला. त्यामुळे दोन्ही देशांचे चलन नष्ट झाले.बँक ऑफ इंग्लंड दिवाळखोर झाली आणि सोरोसने या सगळ्यातून $ १ बिलियन पेक्षा जास्त कमाई केली. त्याचप्रमाणे मलेशिया आणि थायलंडच्या चलनांवर शॉर्ट पोझिशन घेऊन सोरोसने भरपूर पैसा कमावला.

१९९५ मध्ये जॉर्ज सोरोस यांना वाटले की आशियाई देश मलेशिया आणि थायलंडच्या चलनाचे मूल्य जास्त आहे.या कारणास्तव, त्याने या दोन्ही देशांचे बरेच चलन विकत घेतले. १९९७ मध्ये जेव्हा आशियाई देशांमध्ये मंदी आली तेव्हा मलेशियाचे चलन ५०% आणि थायलंडचे चलन ४५ % ने घसरले. पुन्हा एकदा सोरोसने यातून भरपूर पैसा कमावला.

सध्या जॉर्ज सोरोस यांची एकूण संपत्ती ७१ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे.

बालपणी घेतलेल्या ‘हिटलरशाहीच्या’ अनुभवामुळे हा कुठल्याही देशातल्या ‘राईटविंग’ सरकारचा कट्टर विरोधक.त्यामुळेच,आपल्या ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ द्वारे ‘समतेचं राज्य यावं यासाठी कट्टर उजवी विचारसरणी मोडण्याचा कार्यक्रम’ या भंपक समाजसेवेच्या पडद्याआडून लिब्रांडूजचा नव-समाजवाद जगभर पोहोचवायचा त्यासाठी वेळप्रसंगी विविध देशातली सार्वभौम सरकारं सुद्धा उलथवायची, हाच याचा गोरखधंधा..

“एखादा देश हेरला की तिथल्या विरोधकांना पैसे पुरवायचे,तिथल्याच एक्टिव्हिस्टना एकत्र करून सरकारविरोधात रस्त्यावर आणायचं,त्या देशाचा पार चक्का जाम करायचा, हे सगळं झालं की आंदोलनं हिंसक करायची त्यावर सरकारने हिंसेने प्रत्युत्तर दिलं की तिथल्या जनतेला चिथावून सरकार विरोधात उठाव घडवून आणायचा, सरकार पाडायचं,आपलं प्यादं तिथे सत्तास्थानी बसवून तो देश लुटायचा”.. ही याची टूलकीट.

-जाॅर्जियामधली ‘रोझ रिवोल्यूशन’,
-युक्रेनमधला सत्ताबदल,
-हंगेरीच्या, आपल्या मातृभूमीतल्या सत्ताबदलाच्या उलाढाली,
-अरब स्प्रिंग मार्फत ‘ट्यूनिशिया, लिबिया, इजिप्त आणि येमेन’ मधली सरकारं उलथवणं,
-२०११ चं अमेरीकेतलं ‘ऑक्यूपाय वाॅलस्ट्रीट’ हे हिंसक आंदोलन,
-२०२०ला ट्रंप’ला पाडणं

हे सगळे याच्याच कुबुद्धीचे प्रताप….

काही उदाहरणांचा उहापोह पुढीलप्रमाणे;-

१. जॉर्ज बुश यांना पराभूत करण्यासाठी १२५कोटी रुपये खर्च केले

जॉर्ज सोरोस हे अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाला सर्वात मोठ्या देणगीदारांपैकी एक आहेत. २००३ मध्ये त्यांच्या एका मुलाखतीत जॉर्ज सोरोस यांनी अमेरिकन सरकार पाडण्याचे आव्हान दिले होते. जॉर्ज डब्ल्यू बुश यांचे सरकार पाडणे हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले होते.सोरोस यांनी बुश यांना पराभूत करण्यासाठी सुमारे १२५ कोटी रुपये खर्च केल्याचे मान्य केले होते. जॉर्ज बुश यांनी ती निवडणूक जिंकली असली तरी. यानंतर जॉर्ज सोरोस यांनी बराक ओबामा, हिलरी क्लिंटन आणि जो बिडेन यांना अध्यक्ष बनवण्यासाठी खूप पैसा खर्च केला.सोरोस यांनी हंगेरी, तुर्की, सर्बिया आणि म्यानमारमधील सरकारविरोधी लोकशाही आंदोलनांना उघडपणे पाठिंबा दिला. सोरोस यांनी या आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी निधीही दिला.

२. फॉक्स न्यूजवर नाराज, ते नष्ट करण्यासाठी १ दशलक्ष डॉलर्स खर्च केले.

एके काळी जॉर्ज सोरोस फॉक्स न्यूजवर खूप नाराज होते. त्यांनी या मीडिया कंपनीशी उघडपणे भांडण केले. सोरोसने फॉक्स न्यूज नष्ट करण्यासाठी $१ दशलक्ष खर्च केले.हे पैसे जॉर्ज सोरोस यांनी मीडिया मॅटर्स नावाच्या वेबसाइटला दिले होते. 2004 मध्ये लॉन्च झाल्यानंतर, या वेबसाइटने फॉक्स न्यूजच्या विरोधात एकामागून एक अनेक अहवाल प्रकाशित केले. या वेबसाइटने फॉक्स न्यूजला रिपब्लिकन पक्षाचे मुखपत्र म्हणण्यास सुरुवात केली.फॉक्स न्यूजच्या बनावट अहवालाचा पर्दाफाश करून वृत्त कंपनीला जबाबदार धरण्यासाठी हे पैसे खर्च करण्यात आल्याचे मीडिया मॅटरने नंतर नोंदवले.

३. ब्रेक्झिट विरुद्धच्या मोहिमेत £४००,००० खर्च केले.

जॉर्ज सोरोस यांना युनायटेड किंगडमने युरोपियन युनियनचा एक भाग राहावा अशी इच्छा होती. त्यासाठी त्यांच्या सांगण्यावरून ब्रिटनमध्ये युरोपियन युनियनमध्ये राहण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेवर £४००,००० पेक्षा जास्त खर्च झाल्याचा दावा गार्डियनने आपल्या अहवालात केला आहे.ब्रिटनमध्ये, सोरोसच्या पैशांवरील या मोहिमेचे नेतृत्व ब्रिटीश सरकारचे माजी मंत्री आणि संयुक्त राष्ट्रांचे उप-महासचिव लॉर्ड मॅलोच-ब्राऊन यांनी केले.

४. सोरोस यांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ट्रम्प यांना ‘लुटारू’ म्हटले होते.

२०१७ मध्ये जॉर्ज सोरोस यांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘ठग’ म्हटले होते. सोरोस ट्रम्प यांच्यावर इतके नाराज झाले की त्यांनी सांगितले की ट्रम्प व्यापार युद्ध सुरू करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे वित्तीय बाजाराची कामगिरी खराब होईल, असे त्यांनी म्हटले होते. याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे.

अनेक देशांमध्ये अवैध व्यवसाय

जॉर्ज सोरोस जगभरातील देशांत ढवळाढवळ करण्यासाठी आपल्या अफाट संपत्तीचा वापर करतात. ही संपत्ती त्यांनी अवैध व्यवसायातून जमा केली आहे, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. २००२ मध्ये, फ्रेंच न्यायालयाने सोरोसला अवैध व्यवसायासाठी दोषी ठरवले होते आणि त्यासाठी फ्रेंच न्यायालयाने सोरोस यांना $२.३ दशलक्ष दंड ठोठावला होता. सर्वोच्च न्यायालयात अपील करूनही त्यांचा दंड कायम ठेवण्यात आला.

अमेरिकेतही बेसबॉल सामन्यांमध्ये पैसे गुंतवून बेकायदेशीरपणे पैसे कमावल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्याच वेळी, सोरोस हे इटलीच्या फुटबॉल संघ एएस रोमाच्या संदर्भात वादात सापडले होते.

जयशंकर यांची सोरोसना सणसणीत चपराक..

भारताच्या सजग परराष्ट्रमंत्र्यांनीही आपल्या संबोधनात सोरोस यांच्यावर टीका केली. “मी सोरोस यांना केवळ वृद्ध, श्रीमंत आणि आपली भूमिका मांडणारे असं म्हणून थांबू शकतो. पण ते जेष्ठ, श्रीमंत आणि मतं मांडण्याबरोबरच एक खतरनाक व्यक्तीही आहेत. जेव्हा असे लोक विशिष्ट विचार माडंतात तेव्हा ते स्वतःची एक काल्पनिक कथा सांगण्याचा प्रयत्न करत असतात.सोरेस यांसारख्या लोकांना वाटतं की, निवडणुका तेव्हाच चांगल्या असतात जेव्हा त्यांच्या आवडत्या व्यक्ती जिंकतात. पण जर निवडणुकीचा परिणाम काही वेगळाच आला तर ते त्या देशाच्या लोकशाहीत त्रृटी असल्याचं म्हणतात.”

वयोमानापरत्वे बुद्धी चालेनाशी झाली असावी, असे मानावे असे सोरोस यांचे भाषण होते. ज्या स्वातंत्र्याचा गजर स्वत: सोरोस वारंवार करीत असतात, त्या स्वातंत्र्यानुसार त्यांना काहीही बोलण्याचा, लिहिण्याचा आणि कुठलेही कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे व तो जमेल त्या मार्गाने वापरत असतातच.

‘लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स’ म्हणजे विचारांच्या ताकदीने जग बदलण्याच्या कल्पनांना जन्म देणारे विद्यापीठ. सोरोस तिथे शिकले हा काही आक्षेपाचा मुद्दा नाही. मात्र, सोरोस ज्या प्राध्यापकांच्या विचारांच्या प्रभावाखाली घडले, त्यांचे नाव होते कार्ल पॉपर. कार्ल पॉपरही विचारांनी डावेच! भारतीय डावे, युरोपातील डावे आणि विचारांनी स्वतंत्र असणारे लोक ही मोठी विचित्र गुंतागुत आहे.सोरोसनी भरपूर पैसा कमावला आहे. काही लोक त्यांना ‘बँक ऑफ इंग्लंड’चा दरोडेखोर असेही म्हणतात.ज्यात त्यांनी अफाट पैसा कमावला. आता हा पैसा त्यांनी ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’मध्ये वळवायला सुरुवात केली आहे.

इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी सोडली, तर भारतीयांना लोकशाही माध्यमातून आलेले प्रशासन, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तीचे म्हणून मूलभूत हक्क कधीच संघर्ष करावा लागला नाही. कारण, मुळात भारतीय समाजाचा असलेला लोकशाही वरील प्रगाढ विश्वास ! युरोपला मात्र या तीन घटकांसाठी खूप मोठा आणि रक्तरंजित संघर्ष करावा लागला. हा संघर्ष प्रामुख्याने चर्च आणि धर्मगुरूंशी होता. ‘युरोपियन रेनेसान्स’ म्हणजेच ज्ञानशाखांचा उदय हा या मोठ्या संघर्षातून झाला आणि चर्चच्या तावडीतून सामाजिक आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याची पहाट उगविली.

अल्पसंख्याकांच्या हितरक्षणाची जबाबदारी बहुसंख्यांची आहे हे सांगणारे. वाचायला, ऐकायला हे छान वाटत असले तरी हे मूल्य जेव्हा धर्मांध मुसलमानांना लावण्याची वेळ येते, तेव्हा या तथाकथित अल्पसंख्याकांच्या देशविरोधी, घटनाविरोधी, कायदा विरोधी आणि असहिष्णू वागण्याचे काय करायचे, असा प्रश्न असतो. देश विघातक कृत्ये करणाऱ्या धर्मांध मुसलमानाचे काय करायचे, याचे उत्तर सोरोस देऊ शकणार नाहीत, ते आपल्यालाच शोधावे लागेल.मूळ मुद्दा ‘सोरोस’ समजून घेण्यापेक्षा ‘सोरोस’ नावाचा नवा अतिरेकी आणि त्याची विचारसरणी समजून घेण्याचा आहे.

सोरोस यांच्या ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’च्या (open society foundation) अधिकृत माहितीनुसार, जगभरातील १०० हून अधिक अशाच फाऊंडेशनसोबत ते जोडलेले आहेत. यातून कोणत्या प्रकारची परिस्थिती ते लादू इच्छतात, हे आपल्या लक्षात येईल. आपल्याकडे विरोधी विचार करणारे बेरोजगार पत्रकार आणि अभिनेतेही अनेक आहेत. हे सगळे भारतद्वेषाच्या पोटी काहीही करू शकतात.

जगाच्या मानवी संस्कृतीसमोर आज धर्मांध इस्लामचे संकट उभे आहे. तालिबान एका देशाचा मालक होताना आपण पाहिले आहे आणि सोरोस आदी ज्या मूल्यव्यवस्थेवर विश्वास ठेवतात, ती किती तकलादू किंवा जुनाट झाली आहे, ते आपल्या दिसून येईल. मात्र,परिस्थितीचे योग्य आकलन करून प्रतिसाद देणे, हेच भारतहिताचे असेल.

कोवीडकाळात भारताची यथेच्छ बदनामी करून झाली.पण कोवीड अराजका दरम्यान एकशे चाळीस अब्ज लोकसंख्येचा देश फक्त दीडवर्षात स्वतःच्या पायावर उभा राहिलाच , वॅक्सीन-मैत्री अंतर्गत ‘जगभरच्या १०० देशांमधे सुमारे १६.२९ कोटी वॅक्सीन डोसेस free पाठवून’ आत्मनिर्भर भारताने आपली ताकद,सिद्धता जगाला दाखवून दिली.संपूर्ण जग ‘भारताचं’ गुणगान करायला लागलं….!

संपूर्ण विश्व अजूनही कोवीडच्या काळ्या सावलीतून कसंबसं बाहेर पडत असताना भारत मात्र दिमाखात घोडदौड करतोय.सोरोस सारखे पांढरे कातडीचे निर्बुद्ध स्वतःला सुपेरियर रेस समजतात त्यांना आत्मनिर्भर भारताने केलेली अविश्वासनीय प्रगती डोळ्यात खुपते.

हा नवा भारत आहे “अरे ला कारे” करणारच म्हणूनच आड मार्गाने भारताची जागतिक स्तरावरील पत कशी कमी होईल याकडेच सोरोस सारख्या निर्बुद्ध लोकांचे लक्ष असते.

भारतराष्ट्र विश्वगुरू महासत्ता होण्याच्या दृष्टीने प्रगतीपथावर आहे. तेव्हा या मार्गात सोरोस रुपी काटे येणारच पण अश्या बोथट काट्यांना जमिनीत गाडून भारताचा बुलडोजर रुपी रथ मार्गक्रमण करीत आहे.

सोरोस आजोबा ही तर फक्त सुरुवात आहे, आगे आगे देखिये होता है क्या…

म्हणतात ना :- हाथी चले बाजार.. कुत्ते भोके हजार !

https://www.thehindu.com/news/international/george-soros-the-billionaire-philanthropist-india-has-called-opinionated-and-dangerous/article66537946.ece

https://www.newslaundry.com/2023/02/23/yes-arnab-resurrected-an-old-conspiracy-theory-on-soros-being-a-nazi-no-its-still-not-true

Back to top button