Opinion

‘विस्मृतीत गेलेली प्राचीन भारतीय चित्रपरंपरा आणि हिंदू मंदिरांतील जुनी चित्रे’ जाणून घेण्याची सुसंधी

हेरिटेज रेस्टोरेशन विभागाच्यावतीने डिजिटल सादरीकरण कार्यक्रम

गेल्या काही वर्षांपासून भारत तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या विकासात अग्रणी देश बनला आहे.  केवळ जगभरातच नाही तर, संपूर्ण भारतामध्ये देखील तंत्रज्ञानाची व्याप्ती आणि त्याचा वापर  पायाभूत सुविधांच्या नियोजन व अंमलबजावणीत सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. मात्र यापलीकडे भारताची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे आपल्या देशात खोलवर रुजलेली आपली संस्कृती आणि आपला समृद्ध इतिहास. संस्कृती आणि कलेसाठी भारताची ख्याती जगभर पसरली आहे. भारताची ती ओळख बनली आहे. मात्र आजही भारतीय कला आणि संस्कृतीबद्दलच्या या माहितीत काही त्रुटी आहेत.

जगाने मुघल आणि ब्रिटिशांच्या कालखंडात येथे येऊन भारतीय चित्रकलेच्या इतिहासाचा अभ्यास येथील विद्यापीठे व संग्रहालयाच्या माध्यमातून केला आहे. इ.स.पाचव्या शतकातील अजिंठाच्या चित्रांना ओळख मिळाली आहे पण आपल्या या  प्राचीन चित्रकलेची ही परंपरा आपल्या भारतवासियांनाच माहित नाही, ही खेदाची बाब आहे. खरं तर,  संपूर्ण जगात भारताकडेच चित्रकलेची सर्वात मोठी  परंपरा असून त्याचे दाखले  जागतिक प्रतिष्ठित भारतीय कला इतिहासकार  बेनोय के बहल यांनी दिले आहेत. प्राचीन काळातील महान हिंदू, बौद्ध आणि जैन चित्र भारतातील लेण्यांमध्ये आणि मंदिरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 

कर्नाटकातील बदामी गुहेत इ.स. सहाव्या शतकातील चित्र रेखाटलेली आढळली. या चित्रांना प्रथमच भारतातील  कला इतिहासकार, चित्रपट-निर्माता आणि छायाचित्रकार बेनोय के बहल यांनी छायाचित्रात बंदिस्त केले होते. त्यांच्या बदामी पेंटिंग्जच्या छायाचित्रणामुळे ती  समोर आली. सॅपिओ ऍनालिटिक्स या सरकारी सल्लागार कंपनीने आता ही  प्राचीन अशी अज्ञात  हिंदू चित्रे  जगाला दाखविण्यासाठी पुढाकार घेतला  आहे.  बहल यांनी तामिळनाडूतील सातव्या शतकातील अप्रकाशित चित्रांचेही दस्तऐवजीकरण केले आहे. तंजावर येथील दहाव्या शतकातील संपूर्ण जगातील उत्कृष्ट चित्रांचा त्यात समावेश आहे. बृहडेश्वर मंदिरातील भगवान शंकरावर आधारित अद्भुत चित्रे आहेत  बेहल यांची ही चित्रे जेव्हा  छायाचित्रस्वरुपात  जगभरातील विद्यापीठे व संग्रहालये मध्ये दाखवली जातात  तेव्हा तज्ज्ञांनी देखील या प्राचीन काळातील अत्यंत उच्च दर्जाची गुणवत्ता पाहून आश्चर्य व्यक्त केले होते.

पाचव्या शतकातील अजिंठाच्या चित्रांना संपूर्ण आशिया खंडातील बौद्ध चित्रपरंपरेचे मूळ म्हणून ओळखले जाते. जपान, श्रीलंका, म्यानमार आणि इतर देशांतील विद्वानांना या वस्तुस्थितीची सखोल माहिती आहे. दुर्दैवाने, भारतीय मात्र आपली ही महान कलाच विसरले आहेत.

सॅपिओ ऍनालिटिक्सने राष्ट्रनिर्माण उत्पादने आणि प्रक्रिया यावर लक्ष केंद्रित केले आहे. नुकताच नॉर्वे येथील आर्कटिक वर्ल्ड आर्काइव्ह्जमध्ये बेनॉय के बहल यांचे अजिंठा फोटो संग्रहित करण्यात आले.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २९ नोव्हेंबर २०२० मध्ये ‘मन की बात’ या कार्यक्रमात याबद्दलचा उल्लेखही केला होता

‘अजिंठा’  हा भारताच्या अलंकारांपैकी एक आहे. अनेक समृद्ध वारसा स्थळे देखील केवळ आपल्या राष्ट्राची समृद्धता दाखवत नाहीत तर शक्ती आणि भौगोलिक राजकारणाच्या दृष्टीनेही ती तितकीच महत्वाची आहेत. केवळ मुघलकालीन नव्हे तर प्राचीन भारतातील या संपत्तीचे प्रदर्शनही आपल्या राष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देते.

या घटकांच्या आधारे, सॅपिओ ऍनालिटिक्स ’हेरिटेज रीस्टोरेशन डिव्हिजन’ ने केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर आपल्या राष्ट्राचा समृद्ध वारसा आणि मालमत्तेचे डिजिटीलायझेशन,  जतन करणे आणि प्रोत्साहित करणे  ही जबाबदारी स्वीकारली आहे. भारताच्या या मौल्यवान संपत्तीचे दर्शन  केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण  जगासमोर आणण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे. आपल्या देशाची खरी बलस्थाने जगाला दर्शविणे हे त्यांचे  उद्दीष्ट आहे. या उद्देशाने अजिंठा लेण्यांवर काम सुरू केले आहे.  त्यासाठी प्रतिभासंपन्न इतिहासकार बेनोय के बहल यांचे समर्थन प्राप्त झाले आहे. जगातील शेकडो महत्त्वाची विद्यापीठे व संग्रहालयात त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले जाते. त्यांचे प्रदर्शन ७४  देशांमधील ३२५  प्रमुख सांस्कृतिक संस्थांमध्ये आयोजित केले गेले आहे. त्यांचे ‘द अजंठा लेणी’ हे पुस्तक भारतीय कला इतिहासावरील संपूर्ण जगात सर्वाधिक विकले जाणारे पुस्तक आहे.

वेरूळ येथील कैलासमंदिर एका दिवसात बांधले गेले नाही, हे खरे आहे. सॅपिओ ऍनालिटिक्सचाही हा तसाच प्रदीर्घ काळ चालणारा प्रकल्प आहे. त्याची पहिली पायरी म्हणून सहाव्या शतकातील ‘बदामी लेणींमध्ये’ अस्तित्त्वात असलेल्या हिंदु चित्रकलेचे महत्व जगासमोर आणण्याचे ठरवले आहे. त्या अंतर्गत ‘विस्मृतीत गेलेली प्राचीन भारतीय चित्रपरंपरा आणि हिंदू मंदिरांतील सर्वांत जुनी चित्रे’   डिजिटल सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  

बदामी लेणींमधील चित्रकला या जागतिक कला आणि संस्कृतीत एक विशेष प्रासंगिकता दर्शवते. ही केवळ प्राचीन काळात अस्तित्त्वात असलेल्या हिंदू चित्रे नाहीत तर ती जगातील प्राचीन चित्रकलेची भव्य परंपरा आहे. त्यामुळे यास जागतिक महत्व आहे. ही चित्रकला जगातील कला आणि संस्कृती तयार करण्यात भारताच्या मोलाच्या भूमिकेवर प्रकाश टाकते.

 शुक्रवार, दि.   २८ मे २०२१ रोजी  दुपारी ४ वा. डिजिटल  सादरीकरण सुरु करण्यात येणार असून  प्रमुख अतिथी या नात्याने  खासदार  डॉ. विनय सहस्रबुद्धे,  राज्यसभा सदस्य सुरेश प्रभू,   लेखक  अमिश त्रिपाठी, प्रसिद्ध छायाचित्रकार बेनॉय बहल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  इच्छुकांनी https://bit.ly/3f94IJx या लिंक वर नावनोंदणी करायची असून नावनोंदणी अनिवार्य आहे.

Back to top button