HinduismNews

“वारी”.. महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा..

भक्तिमार्गात संगीत हे ईश्वराला साद घालण्याचे प्रभावी साधन मानले जाते. वारकरी संप्रदायात नित्याचे असलेले भजन, हरिपाठ, कीर्तन, भारूड आणि गौळणी हे तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा बनलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानापासून ते सिनेसृष्टीतील विठ्ठलगीतांपर्यंत भक्तिसंगीताने अवघ्या जगाला मंत्रमुग्ध केले आहे.संतांच्या अभंगांनी आणि भजनांनी मराठी संस्कृतीची भक्तिरसपूर्ण परंपरा अधिक समृद्ध केली. जाणून घेऊया मराठी माणसाच्या नसानसांत भिनलेल्या भक्तिसंगीताचा प्रेरणादायी इतिहास.

Back to top button