NewsRSS

संघ शताब्दी निमित्त ज्येष्ठ स्वयंसेवक श्री. राम नाईक यांची विशेष मुलाखत | भाग १ |

माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल पद्मभूषण श्री राम नाईक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत. तीनदा आमदार आणि पाच वेळा खासदार असे सलग निवडून आलेल्या रामभाऊंनी आपली संघाची पार्श्वभूमी ही नेहमीच अभिमानाने दृष्यमान केलेली आहे.

रा. स्व. संघाच्या शताब्दीनिमित्त रामभाऊंशी संवाद करत कोकण प्रांताच्या विश्व संवाद केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर वझे यांनी त्यांची एक प्रदीर्घ मुलाखत घेतली. त्याचा पहिला भाग येथे प्रसारित करत आहोत. ९१ वर्षीय रामभाऊंनी यात मुंबई, पुण्यातील त्यांच्या बाल व तरुण काळातील संघाचं काम.. तसंच त्यांचा संघ ते जनसंघ आणि पुढे भाजप हा प्रवास कसा झाला हा जीवनपट वेगवेगळ्या रंजक आठवणी सांगत उलगडला. विश्व संवाद केंद्राच्या आपल्या प्रेक्षकांसाठी त्यांच्या मुलाखतीचा हा प्रेरणादायी भाग आम्ही इथे प्रसिद्ध करत आहोत…

Back to top button