HinduismNews

“होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी…”

ज्येष्ठ वद्य अष्टमीचा शुभ दिवस….. आळंदी नगरी भक्तिरसाने न्हाऊन निघाली.संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सजवलेल्या पालखी मध्ये माउलींच्या पादुका ठेवून विधिवत पूजा करण्यात आली.

“ज्ञानोबा माऊली… माऊली…”च्या अखंड जयघोषात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली .

वारकऱ्यांच्या मुखी नाम, हृदयी विठ्ठल आणि सोबत माऊली… या अनुभूतीत प्रत्येक पाऊल आनंदमय झाले. समता, प्रेम, माणुसकी आणि भक्तीचा अनुपम संगम पाहायला मिळतो.

“अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक…” या संतवचनांचा संदेश घेऊन माऊलींची पालखी वारकऱ्यांच्या सोबतीने मजल दरमजल करत पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली.

Back to top button