
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा।
आनंदे केशवा भेटताचि।।
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी।
पाहिली शोधुनि अवघी तीर्थे।।
आषाढी एकादशी जवळ येऊ लागली कि अशीच काहीशी अवस्था गोवाभरातील हरिभक्तांची होते. गोव्यात आजघडीला जवळपास २५ वारकरी मंडळे असून सुमारे ५,००० गोमंतकीय विठ्ठलभक्त आषाढी वारीत सहभागी होतात.
गोव्यातील वारकऱ्यांच्या वारीबद्दलच्या भावना, त्यांचा प्रवास, अनुभव याचा घेतलेला हा आढावा…