पंढरीची वारी म्हणजे हिंदू समाजाच्या एकतेचे, भक्तीचे व सेवाभावाचे विशाल दर्शन. जात, पंथ, भाषा, आर्थिक स्थिती या सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन सर्व वारकरी एकमेकांना ‘माउली’ अशी साद घालत एकत्र चालतात. रंगरूप कसेही असले तरी आपण सर्व एकाच संस्कृतीची लेकरे आहोत, ही जाणीव सर्व वारकऱ्यांमध्ये असते. संतांच्या उक्तीतून व भक्तीच्या शक्तीतून निर्माण झालेली ही एकता, सामाजिक समरसता हाच पंढरीच्या वारीचा आत्मा आहे.