News

भारतमाता सेवा प्रतिष्ठान व शिवसंस्कृती ढोल – ताशा पथक यांच्या सहयोगाने भांडुपमध्ये रुग्णोपयोगी साहित्य केंद्र

मुंबई, दि. २२ जुलै : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) मुलुंड भाग संचालित भारतमाता सेवा प्रतिष्ठान व शिवसंस्कृती ढोल – ताशा पथक यांच्या सहयोगाने भांडुप (प.) येथे रुग्णोपयोगी साहित्य केंद्र उभारण्यात आले आहे. गरजूंना अनामत रक्कम भरून या निःशुल्क सेवेचा लाभ घेता येणार आहे

गरजू रुग्णांना काही दिवसांकरिता साहित्य वापरण्याची सुविधा या केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये व्हीलचेअर, कमोड चेअर, वॉकर आदी साहित्यांचा अंतर्भाव आहे.  साहित्यानुसार अनामत रक्कम घेतली जाते तसेच साहित्य परत केल्यावर ती रक्कम परत करण्यात येते. हे केंद्र भांडुप पश्चिम येथील पृथ्वीराज भवन, शिवाजी नगर येथे  सुरु करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी  ९०८२७१९९६३ किंवा ७२०८७५९९९१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 जनकल्याण समिती मुलुंड भागाचे हे तिसरे तसेच मुंबई मधील ४७ वे रुग्णोपयोगी साहित्य केंद्र आहे.

Back to top button