EnvironmentNewsRSSSevaकोकण प्रान्त

“प्लॅस्टिक मुक्त महासागर”

शनिवार, १६ सप्टेंबर २०२३ वर्सोवा येथे "आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिवस" उत्साहात साजरा..

शनिवार, १६ सप्टेंबर २०२३ वर्सोवा येथे “आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिवस” उत्साहात साजरा..

दरवर्षी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता (International Coastal Cleanup Day) दिवस जगाच्या विविध भागांमध्ये आयोजित केला जातो. भारतीय तटरक्षक दल २००६ पासून किनारपट्टीवरील लोकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करीत आहे. तसेच आयसीसी उपक्रमांबाबत सागरी सीमा मंच (कोकण प्रांत) विविध संस्थांमध्ये समन्वय साधुन उपक्रम करीत आहे .

यावेळी त्यांनी ११ चौपाट्या स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेतला. वर्सोवा बीचवर यावर्षी ओशिवरा लोखंडवाला सिटिझन्स फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली कोस्टल क्लिनिंगचा हा उपक्रम पार पडला. तर रॉकी बीच वर एकता मंच आणि सागरी सीमा मंचच्या नेतृत्वाखालीही मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमात वेगवेगळ्या ९ संगटना एकत्र आल्या होत्या. ज्यामध्ये शाळेतील-कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा हिरीरीने सहभाग होता. NSS चे ४० विद्यार्थी होतेच, सोबत वर्सोवा रिक्षा चालक मालक संघटनही सामील झाले होते.

मोहिमेत पर्यावरणाप्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी विविध संस्था पुढे आल्या, सागरी सीमा मंच, रा. स्व. संघ (RSS) पर्यावरण गतिविधि, SFD, माय ग्रीन सोसायटी, रोटरी व लायन्स क्लब, मच्छीमार सोसायटी, NSS, इ. सामाजिक संस्था यांत होत्या. संघाच्या स्वयंसेवकांचा मोठ्या प्रमाणातील सहभाग अत्यंत उत्साहवर्धक होता. ” पर्यावरणाची सेवा हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे, आयसीजी व सागरी सीमा मंच या आपल्या सामाजिक संस्थेचा विश्वास आहे “, असे सीमा मंचाच्या सुरेश गुजर जी यांनी प्रतिपादन केलं.

स्वच्छतेचा हा उपक्रम बघून चौपाटीवर रोज फिरणाऱ्यातल्या काहींनी स्वतःहून येऊन सहभाग घेतला.

सागरी सीमा मंच व ओशिवरा लोखंडवाला सिटिझन्स फाउंडेशन आणि एकता मंच ने स्वछता कार्यकर्त्यांसाठी लागणाऱ्या हातमोज्यांपासून पिण्याच्या पाण्यापर्यंत साधनांची तयारी केली होती.उपक्रमात बघता बघता ४०० ते ५०० लोक सहभागी झाले. आरएसएस स्वयंसेवक विभागुन सगळ्या संघटनांन मदत करत होते.

“आम्ही सकाळी जेंव्हा एकत्रित एवढा समाज बघितला तेंव्हा समाजात सागरी स्वच्छतेविषयी जागरूक असलेला समाज बघून आम्हाला आनंद झाला. लोकांनी बघितलं इथे क्लीनअप ड्राईव्ह होणार आहे असं बघून लोक स्वतःहून जोडले जाऊ लागले. आरएसएस चांगलं काम करीत आहे, आरएसएस लोकांमध्ये जे जागरुकतेचं काम करीत आहे ते बघून मला बरं वाटले. मी सकाळी आलो तेंव्हा बीच ची परिस्थिती काहीतरी वेगळी होती आणि आता वाटतं आहे, नक्कीच काही स्वच्छता झाली आहे. आणि हेच स्थानिक प्रशासनाने ने कायम ठेवावं अशी माझी प्रार्थना आहे.” स्वच्छता उपक्रमाविषयी बोलताना भारतीय तटरक्षक दल कोस्ट गार्ड (Indian Coast Guard) कृतज्ञतेने व्यक्त झाले.

NSS च्या हेड रुचिता यांनी, ” आमच्या NSS चा मोटोच आहे Not me but you. आणि त्या मोटोनुसारच आम्ही काम करतो. आम्ही स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी, समाजासाठी काम करतो, आणि आपल्या मुलांमध्येही त्याची जाणीव आहे कि, आपण समाजाचे घटक असल्याने समाजाचे आपण काही देणं आहे, आणि त्याच मोटिवेशन ने तुम्ही पाहू शकता कसे उत्सहाने मुलं काम करत आहेत… आणि त्यांना पाहून आम्हांलाही तेवढीच एनर्जी येत आहे.”

दोन्ही बीचची सफाई करताना मोठ्या कचऱ्याने भरलेल्या बॅग्स जमा केल्या जात होत्या, या बॅगचा एकत्र कचरा तीन चार ठिकाणी एकत्र केला गेला होता, तो अंदाजे १० क्विंटल पर्यंत झाला असावा. यात काचा, प्लास्टिक गोण्या पासून ते लाकूड आणि थर्माकोल हि होते. बीच ची परिस्थिती एवढी खराब झाली होती कि कित्येक वेळा वरवर दिसणारे प्लास्टिक वाळूत आतपर्यंत रुतले होते. ते बाहेर काढण्यासाठी वाळू खोदावी लागली.

या स्वच्छतेच्या उपक्रमात ओशिवरा लोखंडवाला सिटिझन्स फाउंडेशनचे ट्रस्टी राकेश कोएलो यांनी, “प्लास्टिकचा वापर सोडण्यावर भर द्यावा” हा मॅसेज दिला. शेवटी आपण केलेली स्वच्छता आणि सहभागाचा मिळवलेला परिणाम बघून सर्वानी आनंदाने एकत्र येऊन दीर्घकाळ आठवण राहावी म्हणून फोटो काढले,‘जय हिंद, भारतमाता कि जय ‘ म्हणत या उपक्रमाची सांगता झाली.

सकाळी ७ वाजता सुरु केलेली ही स्वच्छता १० वाजता आटोपली. यावेळी रॉकी बीच, वर्सोवा बीच असे दोन्ही बीचेस स्वच्छ झाले होते.

Back to top button