EducationSeva

बालकांच्या समग्र विकासासाठी कार्यरत विद्याभारतीच्या शिशुवाटिका, कोरोना काळातही निभावले सामाजिक कर्तव्य

आजची बालके ही उद्याचे भविष्य आहेत. भविष्यकाल उज्ज्वल असावा याकरिता त्यांना योग्य पद्धतीने शिक्षण देणे आवश्यक आहे. विद्याभारतीने ही आवश्यकता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाची एक रचना तयार केली आहे. राज्यात मागील २० वर्षांपासून विद्याभारतीच्या या शैक्षणिक रचनेचा अंगीकार अनेक शाळांनी केला आहे. कोकण प्रांतात शिरळ गावात विद्याभारतीची स्वतःची शाळा असून पाचवीपर्यंतचे वर्ग या शाळेत भरतात. या विद्याभारतीशी संलग्न शाळा या केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तक सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेले कार्य हे त्याचे उदाहरण आहे.

विद्याभारतीची रचना हे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पायाचे प्रारूप आहे असे म्हणता येईल. आठव्या वर्षापर्यंत पाटीपेन्सिलमुक्त, अनुभवजन्य, आनंददायी, प्रयोगशील शिक्षण हे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासात सहायभूत ठरते. श्रवण, संभाषण, वाचन व लेखन या चार टप्प्यांमध्ये शिशुवाटिकांमध्ये शिक्षण दिले जाते. या प्रयोगाअंतर्गत वाचनमाला पुस्तिकांची निर्मिती करण्यात आली आहे. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय सक्षम करणे, भाषा सक्षम करणे यांना प्राधान्य दिले जाते. या शिशुवाटिकांना संस्कार करण्याच्या हेतूने संगीत, योग, शारिरीक शिक्षण, संस्कृत तसेच नैतिक शिक्षण अशी पाच माध्यमे दिली जातात. चौथी ते नववीच्या वर्षांसाठी विद्याभारतीच्या माध्यमातून संस्कृती ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात येते. या परीक्षेच्या अभ्यासक्रमात प्राचीन भूगोल, इतिहास तसेच प्राचीन संस्कृती इत्यादीची माहिती दिली जाते. संस्कृती ज्ञान परीक्षेसह अतुल्य भारत परिचय योजनाही चालविली जाते. या योजने अंतर्गत भारतीतील आदर्श व्यक्तिमत्त्वांचा परिचय व्हावा यासाठी वह्या-पुस्तकांवर लावण्यायोग्य स्टिकर्सचे वितरण केले जाते.

केवळ शिक्षणच नव्हे तर सामाजिक जबाबदारी निभावण्याचे कार्यही विद्याभारतीशी संलग्न शाळांनी केले आहे. संघाच्या कोरोना सेवाकार्यात या शाळांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. कोविड१९च्या कालखंडात ऑनलाईन पद्धतीने शाळा चालविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण कसे असावे यासाठी शिक्षक आणि पालकांसाठी कोकण प्रांताच्या वतीने चार ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते. धान्य वितरण, मास्क वितरण, गरजूंना कपडे वितरण करण्यात आले. कोकण प्रांतात विद्याभारतीच्या माध्यमातून १०१ आचार्यांवी २८ ठिकाणी २०००० जणांना मास्कचे वितरण केले. १२२ आचार्यांनी ५९६ जागांवर १७१८ जणांना शिधावाटप केले. १११६८ जणांना चार ठिकाणू भोजन वितरण करण्यात आले तर १० आचार्यांनी आठ ठिकाणी १३८० जणांना सॅनिटाझरचे वितरण केले. चार ठिकाणी १०० पोलिसकर्मींना सुरक्षाव्यवस्थेत साहाय्य करण्यात आले.

विद्याभारतीच्या माध्यमातून ५० जणांनी पंतप्रधान मदत निधी, मुख्यमंत्री मदत निधी तसेच अन्य सेवाभावी संस्थांना ६,९२,००० रुपयांचा निधी दिला. अन्य प्रांतांमध्ये धाराशिव(उस्मानाबाद) येथे भटके-विमुक्त तसेच स्थलांतरित होणाऱ्या मजुरांसाठी २५ दिवसांची निवासाची सोय करण्यात आली. भोजन सुविधा उपलब्ध करण्यात विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्वतःहून सहभाग घेतला. संभाजीनगर येथे मानसोपचारतज्ज्ञांच्या एचा चमूने नागरिकांचे मनःस्वास्थ्य चांगले राहावे यासाठी निरंतर प्रयत्न केले.

**

Back to top button