HinduismNews

भक्तीचा महासागर पंढरीच्या उंबरठ्यावर..

भंडीशेगावहून निघालेली माऊलींची पालखी आता पंढरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचते. बाजीरावच्या विहिरीवरील दुसरे उभे आणि चौथे गोल रिंगण भक्ती, परंपरा आणि उत्साहाचे अद्वितीय दर्शन घडवतात. धुळीत मिसळलेली भक्ती, टाळ-मृदंगाचा निनाद आणि “ज्ञानबा-तुकाराम”चा अखंड गजर संपूर्ण वातावरण चैतन्यमय करतो. वाखरी येथे दोन पालख्यांचा दिव्य संगम घडताच, प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणात विठ्ठलभेटीची ओढ शिगेला पोहोचते. पंढरी आता केवळ काही पावलांवर उभी असते…

Back to top button