गोव्याला गणेश उपासना आणि गणेशोत्सवाची प्राचीन व समृद्ध परंपरा लाभली आहे. पोर्तुगीज शासनकाळातही विविध निर्बंधांना सामोरे जात गोवेकरांनी आपला धर्म, श्रद्धा आणि गणेशोत्सवाची परंपरा जपली. आज माटोळी, घुमट आरती यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांमधून गोमंतकातील गणेशोत्सवाची समृद्ध सांस्कृतिक ओळख अनुभवायला मिळते. गोवेकरांच्या लाडक्या बाप्पाचा उत्सव, त्यामागील इतिहास, धार्मिक परंपरा आणि गोमंतकाच्या संस्कृतीतील गणेशोत्सवाचे स्थान याविषयी इतिहासकार डॉ. रोहित फळगांवकर यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.