पंचपरिवर्तनातील पर्यावरण संवर्धनाचा विचार घेऊन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून गणेशोत्सवादरम्यान विविध उपक्रम राबवले जातात. विसर्जनानंतर किनाऱ्यावर येणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या, तसेच भंगलेल्या गणेशमूर्तींचे श्रद्धा आणि सन्मानपूर्वक विसर्जन, यासोबतच उत्सवात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी सुरक्षा व सुव्यवस्थेत योगदान देण्याचे कार्यही केले जाते . न्याय्य मागण्यांसाठी आवाज उठवणाऱ्या वि. हिं. प आणि बजरंग दलाकडून गणेशोत्सवातील श्रद्धा, सेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा हा सुंदर संगम नेमका कसा घडतो? जाणून घेऊया