समर्थ भारत व्यासपीठाच्या ठाणे, नेरुळ आणि चेंबूर येथील सिग्नल शाळांना हातभार लावण्याची संधी गणेशोत्सवात भाविकांना मिळावी, यासाठी ‘गणेशोत्सव व्हावा दानोत्सव’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सिग्नलजवळ, उड्डाणपुलांखाली आसरा घेऊन उदरनिर्वाह करणाऱ्या बेघर मुलांना या सिग्नल शाळांच्या माध्यमातून शिक्षणाची संधी दिली जात आहे. श्रीगणेशाच्या भक्तीतून आपणही या मुलांच्या शिक्षणाला बळ देऊया आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावूया! या उपक्रमाबद्दल जाणून घेऊया ….