NewsRSS

संघकार्याचा आत्मा, राष्ट्रभक्तीची भावना!

उदय शेवडे, संघटन मंत्री, कोकण गोवा, संस्कार भारती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा केंद्रबिंदू म्हणजे राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माणाची अखंड प्रेरणा! राष्ट्राप्रती निष्ठा, समाजाप्रती कर्तव्यभावना आणि संस्कारांप्रती बांधिलकी या मूल्यांच्या आधारे संघ व्यक्तिनिर्माणाचे कार्य करतो. शाखेच्या माध्यमातून शिस्त, स्वावलंबन, बंधुभाव आणि सामाजिक समरसतेचे संस्कार रुजवत राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी पिढी घडवण्याचा प्रयत्न केला जातो.

राष्ट्रभक्ती ही केवळ घोषणांमधून व्यक्त होत नाही, तर ती आपल्या कृतीतून, कर्तव्यातून आणि समाजासाठी दिलेल्या योगदानातून सिद्ध होते. त्या दिशेने संघ शतकभराच्या वाटचालीत राष्ट्रभक्ती भाव प्रत्येकाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी होण्याची गरज आहे .

https://www.facebook.com/VSKKokan

Back to top button