HinduismNewsकोकण प्रान्त

ज्यांचे आरमार त्याचा समुद्र..

छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळीच स्वदेशी आरमाराचे महत्त्व ओळखले होते. “ज्यांचे आरमार त्याचा समुद्र” हे शिवरायांचे चिंतन त्यांनी आज्ञापत्रातून ठळकपणे मांडले आहे.


१४९८ मध्ये वास्को-द-गामा भारतात आल्यानंतर, एकामागून एक अनेक युरोपीय सत्ता इथे दाखल झाल्या. या युरोपीय सत्तांचे आरमार इतके शक्तिशाली होते की, इंग्रज आणि पोर्तुगीजांनी पश्चिम किनारपट्टीवर आपले पूर्ण वर्चस्व निर्माण केले होते; अगदी बलाढ्य मुघल सत्ताधीशांनाही समुद्रात प्रवास करण्यासाठी त्यांची मदत घ्यावी लागत असे. या परकीय वर्चस्वाला मोडीत काढण्यासाठी छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे स्वतंत्र आणि शक्तिशाली आरमार स्थापन केले.


शिवरायांनी शून्यातून निर्माण केलेले हे आरमार नेमके कसे होते? आणि या आरमाराने परकीय सत्तांना नमवत कसा पराक्रम गाजवला? हे जाणून घेऊया या व्हिडिओतून!..

Back to top button