NewsRSSकोकण प्रान्त

वसई मधे संघाच्या प्रारंभिक वर्गात केळीच्या पानावर जेवण – दुष्काळात साधेपणाचा आदर्श

महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. पाणी टंचाई आणि शेतकऱ्यांवरील संकट पाहता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय प्रारंभिक वर्गात एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या वर्गात सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवकांना केळीच्या पानावर जेवण देण्यात आले. पत्रावळी / थाळ्या धुण्यासाठी पाणी वाया जाऊ नये आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश द्यावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला.

केळीच्या पानावर जेवण ही आपली जुनी भारतीय परंपरा असून, यामुळे पाण्याची मोठी बचत झाली. तसेच या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला. या वर्गात एकूण ८० स्वयंसेवक उपस्थित होते. सर्वांना दररोज दोन वेळा केळीच्या पानावर जेवण देणे हे मोठे आव्हान होते परंतु जिल्हाच्या पर्यावरण गतीविधी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत या सर्व गोष्टीमूळे ते शक्य झाले.

८० लोक x ३ दिवस x २ वेळचं जेवण = ४८० प्लेट
४८० प्लेट x १ लिटर = ४८० लिटर अंदाजे पाणी वाचलं!

या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, दुष्काळात प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Back to top button