स्वरतरंगिणी…
राष्ट्र सेविका समितिच्या नव्वदाव्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून संपूर्ण कोकण प्रांतामधून घोषवादन विशेष “स्वरतरंगिणी” या कार्यक्रमाचे रविवारी १६ ऑगस्टला दुपारी ४ ते सायं ६.३० या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोकण प्रांतात समाविष्ट एकूण नऊ जिल्हे व एक महानगरातून साखळी पद्धतीने घोषवादन करण्यात येईल.
ती दहा ठिकाणे पुढील प्रमाणे-
१. उत्तर रत्नागिरी
वं सरस्वतीबाई आपटे जन्मस्थान, आंजर्ले , कड्यावरील गणपती देवस्थान, आंजर्ले
२. दक्षिण रत्नागिरी
पतीत पावन मंदिर, रत्नागिरी
३. सिंधुदुर्ग
राजकोट, मालवण
४. गोवा
महालसा नारायणी मंदिर, वेर्णा
५. वसई
श्री भवानी शंकर मंदिर, आगाशी नाका
६. रायगड
वीरेश्वर मंदिर, खालापूर
७. ठाणे
आन ठाकूर मान ठाकूर उद्यान डोंबिवली (प. )
८. पार्ले
वीर सावरकर उद्यान, बोरीवली
९. ठाणे महानगर
कोलशेत खाडी, ठाणे (पश्चिम)
१०. मुंबई
सावरकर स्मारक समिति , दादर (पश्चिम)
आपल्या जवळच्या ठिकाणी कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे हे नम्र आवाहन.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण “समिति संवाद- कोकण प्रांत” या प्रांताच्या अधिकृत फेसबुक पेजवर करण्यात येणार आहे.
https://www.facebook.com/share/1BghJjMeWJ
या लिंकवर भेट देऊन आपल्याला कार्यक्रम पाहता येईल.