Newsकोकण प्रान्त

अखंड भारत दिन व स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अभाविपचे कोकण प्रांतात विविध कार्यक्रम

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने १० ते १७ ऑगस्ट या आठवड्यात कोकण प्रांतात सदस्यता अभियानासह विविध विद्यार्थी-केंद्रित उपक्रम राबवले. वसई जिल्ह्यात ११ ऑगस्टपासून सदस्यता अभियान राबवण्यात आले. वसई पश्चिम येथील जी. जी. महाविद्यालयात सकाळी सात वाजल्यापासून विद्यार्थ्यांशी संपर्क साधून अभाविपची सदस्यता नोंदणी करण्यात आली.

संदर्भ: अभाविप वसई फेसबुक
https://www.facebook.com/share/r/1BmvHvf3jD/

१५ ऑगस्ट २०२६ रोजी गोव्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, श्रीनिवास सिनाई धेंपो महाविद्यालय (स्वायत्त) आणि उन्नत भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांचा भाग म्हणून श्रीनिवास सिनाई धेंपो महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले. अभाविपचे कोकण प्रांत सह-सचिव (joint secretary) यश कंटक यांनी यावेळी विद्यार्थ्यांना अभाविपची भूमिका आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. यश कंटक आणि महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका उत्कर्षा कोरगावकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

संदर्भ:- अभाविप गोवा फेसबुक
https://www.facebook.com/share/p/1JoQQYACg7/

अखंड भारत दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध शाखा तसेच अभाविपतर्फे विविध ठिकाणी मशाल मिरवणुका काढून भारताच्या फाळणीच्या इतिहासाचे स्मरण करण्यात आले आणि अखंड भारताचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

संदर्भ:- अभाविप गोवा फेसबुक
https://www.facebook.com/share/p/195Z78uDPf/

Back to top button