Newsकोकण प्रान्त
राष्ट्र सेविका समितीच्या ९० व्या वर्षानिमित्त दहा ठिकाणी ‘स्वरतरंगिणी’
राष्ट्र सेविका समितीच्या स्थापनेच्या ९० व्या वर्षानिमित्त कोकण प्रांतात १६ ऑगस्ट रोजी ‘स्वरतरंगिणी’ या विशेष घोषवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोकण प्रांतातील दहा वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी घोषवादन करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले आणि रत्नागिरी शहर, सिंधुदुर्गातील मालवण, गोव्यातील वेर्णा, पालघर जिल्ह्यातील वसई, रायगडमधील खालापूर, ठाणे परिसरातील डोंबिवली आणि कोलशेत, मुंबईतील बोरिवली आणि दादर अशा दहा ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दादरमधील कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्र सेविका समितीमध्ये घोषवादनाची स्वतंत्र परंपरा आहे. समितीच्या ९० वर्षांच्या वाटचालीच्या निमित्ताने या वाद्यपरंपरेचे सार्वजनिक दर्शन घडवण्यासाठी ‘स्वरतरंगिणी’चे आयोजन करण्यात आले.