विद्या आणि विवेकाचे स्वामी असलेल्या श्रीगणेशाच्या भक्तीतून शिक्षण आणि राष्ट्रसेवेचा संकल्प साकारण्यासाठी पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान एक स्तुत्य उपक्रम राबवते. देशाच्या पूर्व सीमेवरील राज्यांमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीयत्व, संस्कार आणि भारतीय परंपरा बळकट करण्याच्या उद्देशाने गणेशोत्सवादरम्यान दानपेटी अभियान राबवले जाते. या माध्यमातून पूर्व सीमेवरील भारतीयांमध्ये देशभक्ती, बंधुभाव आणि एकतेची भावना दृढ करण्याचे कार्य केले जाते. जमा झालेल्या प्रत्येक रुपयामागे मोठा राष्ट्रीय संकल्प कसा उभा रहातो? काय आहे हा उपक्रम आणि त्यातून देशसेवा कशी घडते? जाणून घेऊया या…