HinduismNews

देश-विदेशातील गणेश मूर्ती आणि भारतीय संस्कृती!

श्री गणेश हे समस्त भारतीयांचे आराध्य दैवत आहेच पण त्याचबरोबर परदेशातही त्याची महती तेवढीच असल्याचं दिसून येतं. परदेशातील गणेश मंदिरे किंवा उत्खननात सापडलेल्या गणेशमूर्ती पाहिल्यानंतर प्राचीन भारतीय संस्कृतीचा प्रभाव सातासमुद्रापारही पोहोचल्याचे लक्षात येते. श्रीलंका, चीन, जपानपासून अगदी ग्रीस आणि रोमपर्यंत प्राचीन भारतीय संस्कृतीच्या संपर्काचे आणि प्रभावाचे विविध पुरावे आढळतात. विविध देशांमध्ये श्रीगणेशाचे रूप आणि नाव वेगवेगळे असले, तरी त्यांच्यामागील श्रद्धाभावात एक विलक्षण साम्य दिसून येते. विविध संस्कृतींनी आपापल्या परंपरेत श्रीगणेशाला दिलेले स्थान हे भारतीय संस्कृतीच्या व्यापक प्रभावाचे दर्शन घडवते, ही आपल्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.

https://www.facebook.com/VSKKokan/?ref=embed_page#

Back to top button