मराठ्यांचा इतिहास पराक्रमासोबतच हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेत स्वाभिमान आणि भारतीय संस्कृतीच्या संरक्षणाची व्यापक दृष्टी होती. मराठ्यांनी पुढे भारतभर लढत स्वराज्याच्या विचाराचा विस्तार केला. अटक ते कटकपर्यंतचा हिंदवी साम्राज्याचा भौगोलिक विस्तार हा भारतीय संस्कृतीच्या प्रतिकारपर्वाचे प्रतीक होता. विभाजन विभीषिका समजून घेत असताना छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राष्ट्राच्या सीमा आणि संस्कृतीविषयी काय सांगतात, जाणून घेऊया या व्हिडिओतून..