जागतिक आदिवासी दिनामागील षड्यंत्र | विशेष मुलाखत | शरद चव्हाण

जगभरातील जनजातीय समाजावर वसाहतवाद्यांनी केलेल्या अन्याय-अत्याचारांची जाणीव करून देण्यासाठी ९ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिन’ किंवा ‘जागतिक मूलनिवासी दिन’ म्हणून पाळला जातो. मात्र, या दिवसामागील संकल्पना भारतीय जनजातीय समाजाच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वास्तवाला लागू होते का, याविषयी विविध मते आहेत.
भारतीय जनजातीय समाजाच्या डिलिस्टिंगच्या मागणीचे स्वरूप काय आहे? त्यांच्या बोलीभाषा, कला, लोककला, पारंपरिक उपासना पद्धती आणि सामूहिक संस्कृतीसमोर कोणती आव्हाने उभी आहेत? सक्ती, फसवणूक आणि प्रलोभनांच्या माध्यमातून होणाऱ्या धर्मांतराचा जनजातीय समाजावर काय परिणाम होतो? ‘आदिवासी’, ‘जनजाती’ आणि ‘मूलनिवासी’ या संकल्पनांमधील फरक नेमका काय आहे?
या विशेष मुलाखतीत वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते शरद चव्हाण यांनी जागतिक मूलनिवासी दिनाची पार्श्वभूमी, संयुक्त राष्ट्रांची भूमिका, भारतातील जनजातीय समाजाचे घटनात्मक अधिकार भारतीय समाजाची सांस्कृतिक एकात्मता यांविषयी आपली भूमिका मांडली आहे…