संघकार्याच्या विस्तारात आणि सेवाकार्याच्या अखंड प्रवाहात राष्ट्र सेविका समिती च्या प्रचारिकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ध्येयाप्रती समर्पण, समाजाप्रती बांधिलकी आणि राष्ट्रकार्यासाठी जीवन अर्पण करण्याची वृत्ती हे प्रचारिकांच्या कार्याचे वैशिष्ट्य!
संघटन, संस्कार, समाजप्रबोधन आणि सेवाकार्य अशा विविध क्षेत्रांत कार्यरत राहून प्रचारिका राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला सातत्याने बळ देतात. त्यांच्या समर्पित जीवनकार्याच्या बळावर सेवाकार्याचा हा प्रवाह अविरत सुरू आहे.
मनिषा संत..
अ. भा. शारीरिक शिक्षण प्रमुख, राष्ट्र सेविका समिती