NewsRashtra Sevika SamitiRSS
राष्ट्र सेविका समिती : राष्ट्रनिर्माणात महिलाशक्तीचा सक्रिय सहभाग
मनिषा संत, अ.भा. शारीरिक शिक्षण प्रमुख, राष्ट्र सेविका समिती
समाजाच्या सर्वांगीण विकासात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून देशभरात शाखा चालवल्या जातात आणि या शाखांच्या माध्यमातून सेवा, संस्कार, स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम राबविले जातात. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, बालसंस्कार, कुटुंब प्रबोधन, गरजू महिलांना मदत आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केले जाणारे कार्य समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रेरणा देते.