News

संघशक्ती :- स्वयंसेवक

संघाच्या अनेक शक्ती आहेत त्यांच्या बळावरच संघाने १०० वर्षांचा प्रवास पूर्ण केलाय. २०२५-२६ हे वर्ष संघ शताब्दी चे वर्ष.अनेक संघ शक्तींपैकी एक शक्ती म्हणजे स्वयंसेवक…

संघाची शाखा संघटनकुशल कार्यकर्ता निर्माण व्हावे म्हणून चालवली जाते. संघाने त्याला ‘स्वयंसेवक’ हे नाव स्वीकारले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा अर्थ थोडक्यात असा लावता येईल. ‘राष्ट्रीय म्हणजे हिंदू’, ‘संघ म्हणजे समाज’, ‘हिंदू समाज संघटित करण्याचा विडा ज्यांनी उचलला आहे ते स्वयंसेवक’.

सर्वसामान्यपणे एखाद्या अधिवेशनासाठी कार्यक्रमांची व्यवस्था करणार्‍यांना स्वयंसेवक म्हटले जात असे. डॉ. हेडगेवार यांच्या मनातील ‘स्वयंसेवक’ ही संकल्पना पूर्णपणे भिन्न होती. संघटन करणे म्हणजे माणसे जोडणे. साहजिकच स्वयंसेवक अहंभावी असून उपयोग नाही. संपूर्ण समाजाबद्दल आत्मीयता असणारा स्वयंसेवक मृदुभाषी, मितभाषी असावा.प्रतिज्ञा घेऊन काम करणारा असावा.हिंदू समाज संघटनेचे कार्य धैर्याची कसोटी पाहणारेच आहे. ‘कार्यंवासाधयेत् देहंवापातयेत्’ अशी मनोभूमिका ठेवूनच काम निरंतर कार्य करणारा म्हणजेच स्वयंसेवक…

Back to top button