CultureHinduismNewsReligionRSS

छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य म्हणजेच “हिंदूराष्ट्र” ;- सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(rashtriya swayamsevak sangh):- तृतीय वर्ष वर्ग समारोप कार्यक्रम

स्वच्या आधारावरच होईल जीवनाची पुनर्रचना व देशातील समरसता , देशाची अखंडता कामय ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी : सरसंघचालक डॉ.मोहन भागवत(mohanji bhagwat)

देशाला स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झाले. आदर्श देणारे हजारो चरित्र या माध्यमातून आपल्यासमोर आले व आपल्या स्मृती जागृत झाल्या. यातून देशाप्रति गौरव, स्वाभिमानदेखील जागृत झाला. अनेकांना यातून प्रेरणा मिळाली. आपल्या देशाचा जगभरात गौरव होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना, आर्थिक संकटात भारताने चांगली कामगिरी केली. जग आपल्या देशाची प्रगती पाहून विस्मयचकित होत आहे. जी-२०(G-20) ची अध्यक्षता भारताला मिळाली. नव्या संसदभवनाचे उद्घाटन झाले. तेथील चित्र व एकूण वातावरण जगाने पाहिले. आपल्या देशाला वास्तवात ज्या जागृतीची आवश्यकता होती, त्या जागृतीला आणण्याचा प्रयत्न होत आहे. भारताची प्रगती होत आहे, अंतर्गत अनेक बाबींमध्ये सुधारणा होत आहे. त्यामुळे सामान्य जनता आनंदित होत आहे.

देशातील अनेक ठिकाणी अंतर्गत वाददेखील आहेत. भाषा, पंथ-संप्रदायांवरून विवाद, सवलतींवरून वाद  आहेत व आपापसातच हिंसा करतो आहे. आपण शत्रूंना आपले बळ न दाखवता आपापसात लढत आहोत. आपण एक देश आहोत याचा विसर पडतो आहे. याला प्रोत्साहन देणारे अनेक लोक आहे. राजकारणात विविध पक्ष राहतील व सत्तेसाठी स्पर्धा असतेच. मात्र त्याचीदेखील मर्यादा असतेच. त्यांनी एकमेकांवर टीकाटिप्पणी करायला हवी. मात्र लोकांमध्ये विसंवाद उपस्थित होऊ नये व देशाचे नाव खराब होऊ नये एवढा विवेक तरी बाळगायला हवा. मात्र तो विवेक काही राजकारण बाळगत नसल्याचे चित्र आहे. यामुळे सामान्य जनता दुःखी होत आहे, त्यांना हे लोक दिसत आहे. देशाची अखंडता कायम ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. दोषारोपण करून काहीच साध्य होणार नाही.

आपल्या मनात मधल्या काळात जातीपाती, संप्रदायांवरून भेदभाव निर्माण झाला. मात्र बाहेरून आलेले लोक आता आपलेच झाले आहेत. बाहेरच्यांशी असलेला संबंध विसरून या देशात त्यांनी रहायला हवे. आपणदेखील त्यांच्याशी आपलेच समजून वागले पाहिजे व ते कुठे चुकत असतील तर त्यांचे प्रबोधन करायला हवे. मात्र या भेददृष्टीमुळे नाहक नुकसान होते.

आपल्या स्वार्थासाठी भारतात कलह निर्माण करण्याचा काही बाहेरील लोक प्रयत्न करतात. त्यांना संधी मिळते व ते वाद वाढविण्यासाठी कुचक्र रचतात. सत्य स्थितीला जाणून, भूतकाळ-वर्तमानकाळातील स्थिती समजून सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे.

अहंकार, मतभेदांमुळे भूतकाळाचे ओझे आपण आपल्या मनावर ठेवले आहे. त्यातूनच आपण समरस होण्यास घाबरतो. संपूर्ण भारत मातृभूमी आहे. त्यात समरस झाल्याने कुणाचीही ओळख मिटणार नाही. भारतात सर्वांची विशिष्ट ओळख सुरक्षित आहे. भारताबाहेर असे चित्र दिसत नाही. तेथे विशिष्ट ओळख दिसली तर नागरिकांचे जगणे कठीण होते.

स्पेन, मंगोलियामध्ये मुस्लिमांचे आक्रमण झाले. तेथील लोक जागृत झाले व त्यांनी तेथे बदल घडवून आणला. आपल्या देशात इस्लामची पुजा सुरक्षितपणे करता येते. सहजीवन अनेक शतकांपासून सुरू आहे. मात्र ते न पाहता भेदभावाचे धोरण चालविणे कितपत योग्य आहे याचा विचार व्हायला हवा.

आपले पुर्वज या देशाचे पूर्वज आहेत ही वास्तविकता स्वीकारायला हवी. विविधता ही संघर्षाचे कारण आपल्याकडे बनत नाही. मात्र आपण संस्कृतीला विसरतो आहे. आपल्याला अगोदर आत्मविस्मरण झाले व नंतर बाहेरच्यांच्या आक्रमणाचे शिकार झालो.

आपल्या देशात जातीपातींवरून अन्याय झाला आहे. त्यांचे कर्ज आपल्याला चुकवावेच लागेल. पुर्वज आपण बदलू शकत नाही. आपली छोटी ओळख मिटेल या भ्रमपूर्ण भितीतून देशाच्या एकतेकडे दुर्लक्ष का होत आहे.

समाजातील विकृतींना हटविल्यावर आपण स्वत्वाला योग्य ठेवू शकतो. अगोदर आपण आपले स्वत्व विसरलो. यामुळेच ज्यांची हिंमत नव्हती त्यांनी आक्रमणांवर आक्रमण केले. आपण विविधतांचा उत्सव मनविणारे लोक आहोत. ज्यांना जगात कुठेही आश्रय मिळत नाही, त्यांना देशात सुरक्षित स्थान मिळते.

आपल्या स्वत्वासह सर्व लोक एकत्रित राहू शकतो. भारतासोबत आपला कुठला व्यवहार नाही, कुठली अपेक्षा नाही, तर आपली नाळ देशाशी जुळली आहे. भारताप्रति उत्कट भक्ती घेऊन आपण विविधतांसोबत एकमेकांसोबत राहू शकतो. स्वच्या आधारावर जीवनाची पुनर्रचना व्हायला हवी.

लहान लहान कारणांवरून एकमेकांशी संघर्ष करणे अयोग्य. आपल्याला सोबत रहायचे आहे याचा विसर पडतो व त्यातून या गोष्टी घडतात. सर्वांनी संयम बाळगला पाहिजे.

ड्रग्जचे व्यसन का लागते. शॉर्टकटने दुःख विसरण्याचा प्रयत्न केल्या जातो. त्यामुळे ड्रग्ज, मद्याचे व्यसन लागते. वेळ घालविण्यासाठी सेवा, चांगले कार्य, अभ्यास यांची सवय सुटते तेव्हा व्यसन लागतात. ज्ञान मिळविण्यासाठी कष्टाचा कंटाळा येतो तेव्हा तरुण अशा मार्गावर जातात. त्यामुळे स्वत्वाची आवश्यकता आहे.

जोशीमठासाठी घटना झाली, भूकंप येत आहेत. याचे कारण काय..पर्यावरणाप्रति अपूर्ण दृष्टीकोन घेऊन भारतच नव्हे तर जगातील लोकांनी मार्गक्रमण केले. याचा फटका बसतो आहे. त्वरित योग्य मार्ग शोधण्याची आवश्यकता आहे. देशवासियांच्या कष्टांची खूप आवश्यकता आहे. जग भारताकडून नव्या दिशेची अपेक्षा ठेवत आहे. ती क्षमता आपल्याकडे आहे. या क्षमतेला जी दिशा पाहिजे आहे ती आपण अद्याप पूर्णपणे पकडू शकलेले नाही. त्यासाठी दृष्टी जागृत करावी लागेल व संस्कार द्यावे लागतील. विवाद नव्हे तर संवादावर भर द्यावा लागेल. आपण सगळे वरून विविध दिसून येतो, मात्र आतून आपण सर्व एकच आहोत. भारत मातृभूमी आहे व हीच एकतेची प्रेरणा आहे.

संवेदना, परस्परविश्वास यावर विश्वास ठेवून चालणे हाच या समस्येवरील रस्ता आहे. एकतर्फी संवादातून आत्मियता वाढू शकत नाही. सर्वांनाच देशासाठी काही ना काही त्याग करावा लागेल. त्यासाठी सवय लागणे आवश्यक आहे. याच प्रक्रियेला संस्कार म्हणतात. हेच संस्कार देण्याचे काम सर्वांनी एकत्रितपणे केले पाहिजे. संघाकडून हेच काम करण्यात येत आहे.

मागील शंभर वर्षात जे देश प्रगत झाले व कोसळले, तेथे तेथील सामान्य जनतेच्या भूमिकेचे अध्ययन करा. जेव्हा जनता राष्ट्रहितासाठी एकत्रित आली तेव्हा त्या देशांनी प्रगतीचे शिखर गाठले.

शिवाजी महाराजांनी(shivaji maharaj) राष्ट्राच्या स्वत्वाची घोषणाच केली होती व त्यातूनच हिंदवी साम्राज्याची स्थापना केली. शिवरायांनी जुनी मुल्ये जागृत केली. गोहत्या थांबविल्या व मातृभाषेत व्यवहार सुरू केले. नौदलाची स्थापना केली. त्यांनी जनतेला एकत्रित जोडले. देशाप्रति नाते ठेवणाऱ्यांना त्यांनी सुरक्षित केले. शिवरायांच्या गौरवशाली कार्याचे उद्या देश स्मरण करेल. सामान्य व्यक्तीला सगुण आदर्श हवे असतात. स्वयंसेवकांनी हनुमान व छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श बाळगावा.

संघाला काहीही नको व श्रेयदेखील नको. समाज स्वयंसेवकांसोबत कार्य करत आहे व त्यातून चांगल्या गोष्टी घडत आहेत.

https://www.loksatta.com/desh-videsh/rss-chief-mohan-bhagwat-on-hindu-muslim-unity-in-india-pmw-88-3696065/

Back to top button