NewsRSS

रा. स्व. संघाच्या कार्यक्रमांत सहभागाची सरकारी कर्मचाऱ्यांना मुभा; ५४ वर्षांनंतर उठवली बंदी

रा. स्व. संघाच्या कार्यक्रमांत सहभागाची सरकारी कर्मचाऱ्यांना मुभा; ५४ वर्षांनंतर उठवली बंदी

चंदिगड : हरियाणात ५४ वर्षांनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांत सहभागी होण्यास सरकारी कर्मचाऱ्यांवर असलेली बंदी सरकारने उठवली आहे. मुख्य सचिव विजय वर्धन यांनी याबाबतचे आदेश प्रसृत केले आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांत सहभागी होता येणार आहे.

१९६७ साली तत्कालीन मुख्य सचिवांच्या कार्यालयाने सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आले असल्याचे जाहीर केले होते. ते जर या कार्यक्रमांत सहभागी झाले तर तो सेवाशर्ती नियमांचा भंग मानला जाईल व त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.असेही यावेळी सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात केंद्रीय गृह कामकाज विभागाने १९७५ मध्येच सरकारी कर्मचाऱ्यांना रा. स्व. संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावरची बंदी उठवली होती. पण आजपर्यंत हरयाणात याची अंमलबाजवणी झाली नव्हती.

२०१६ मध्ये नवीन वर्तन नियम लागू करण्यात आले होते. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना राजकारणात किंवा राजकीय कार्यक्रमांत भाग घेता येणार नाही, असे या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.

Back to top button